शहराची खबरबात - परवानगी असलेल्या दुकानदारांना चाचणी सक्तीची - आयुक्त शंकर गोरे
News24सह्याद्री - परवानगी असलेल्या दुकानदारांना चाचणी सक्तीची - आयुक्त शंकर गोरे... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
| 1. बोठेने कॉल केलेल्या वकिलांना नोटीसा |
| रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याने पारनेर उपकारागृहातून वकिलांना फोन केल्याची माहिती समोर आल्यानंतर संबंधीत दोन वकिलांना पोलिसांनी नोटीसा पाठविल्या आहेत. या नोटीसाद्वारे त्यांना जबाब नोंदविण्यासाठी बोलविण्यात आले असल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी दिली. दरम्यान करागृहात मोबाईल आढळून आल्याप्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात आतापर्यंत 11 आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यांना गुन्ह्यात सहआरोपी करून घेण्यात आले आहेत. आरोपी बाळ बोठेने मोबाईलचा वापर केल्याचे पोलीस तपासात समोर आले. |
२. दरोड्याच्या तयारीतील सराईत गुन्हेगारांची टोळी जेरबंद
सहा वर्षांपासून फरार आणि दरोड्याच्या तयारीत असलेल्या नऊ दरोडेखोरांच्या टोळीला नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केल आहे. त्यांच्याकडून गावठी कट्टा, काडतूस, तलवार, लोखंडी कटावणी, सुरी. लाकडी दांडके आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत, शिर्डी सिन्नर रोड वरील झगडे फाटा येथे रात्री साडेआठच्या सुमारासस्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केलीय.
३. परवानगी असलेल्या दुकानदारांना चाचणी सक्तीची
महानगरपालिका क्षेत्रामध्ये ज्या आस्थापनांना परवानगी आहे, त्यांना rt-pcr चाचणी बंधनकारक असून 25 मे नंतर तपासणी केल्याचे आढळून आल्यास कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी दिला आहे. सर्व दक्षता पथक आणि प्रभाग समिती कार्यालय आपल्या प्रभागातील ज्या आस्थापनांना परवानगी आहे.
४. पदोन्नतीतील आरक्षण रद्द करणारा निर्णय मागे घेण्याची मागणी
मागासवर्गीयांच्या पदोन्नतीमधील ३३ टक्के आरक्षण रद्द करण्याचा निर्णय शासनाने नुकताच घेतला आहे .हा निर्णय अन्यायकारक असून तो त्वरित मागे घ्यावा अशी मागणीही मागासवर्गीय संघटनांच्या आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत कास्ट्राईब संघटनेच्या वतीने जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलय.
५. कोरोनाच्या २ऱ्या लाटेत २८४ पोलीस कोरोनाबाधित
अविरत कर्तव्य निभावत सर्वसामान्यांना सुरक्षा देणाऱ्या पोलीस दलाने कोरोनाच्या दुसऱ्याला लाटेतही स्वतःला सिद्ध केल आहे. कर्तव्य निभावताना बाधित झालेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी कोरोनावर मात केली आणि ते कर्तव्यावर हजर झाले आहेत. पहिला लाटेमध्ये जिल्हा पोलिस दलातील 393 पोलिस कर्मचारी आणि अधिकारी कोरोना बाधित झाले होते. त्यातील पाच कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागलाय.
No comments
Post a Comment