20 मे सह्याद्री टॉप १० न्युज
News24सह्याद्री - जन्मदात्या पित्याचा मुलांकडून निर्घुण खून...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
१. २०० निराधार आणि विधवा महिलांना मोफत किराणा किट आणि कोरोना किटच वाटप
सध्या संपूर्ण भारतदेश कोरोनाशी लढा देतोय.लोकडाऊन मुळे ग्रामीण भागातील गोरगरीब जनतेच्या हाताला काम नाही त्यामुळे आर्थिक परिस्थितीच गणितही सर्वसामांन्यसाठी बिघडलाय. ग्रामीण तसेच शहरी भागातही पुष्कळसे कुटुंब मदतीच्या अपेक्षेत आहेत. अशा परिस्थितीत विधवा आणि निराधार महिला दुर्लक्षित होतायत. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर येते प्रशासकीय इमारत येथे भूमी फाउंडेशन कडून प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील आणि भूमी फाउंडेशन चे अध्यक्ष कैलास पवार आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या हस्ते विधवा आणि निराधार महिलांना किराणा किटसह कोरोना किटचे मोफत वाटप करण्यात आलं.
२. 60 वर्षीय महिलेचा डोंगरावरून तोल जाऊन मृत्यू
तौक्ते चक्रीवादळाचा फटका संगमनेरला तालुक्याला ही बसलाय तर या वादळामध्ये शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या 60 वर्षीय महिलेचा डोंगरावरून तोल जाऊन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. संगमनेर तालुक्यातील कोठे बुद्रुक येथील कोंबडी मळा शिवारातील डोंगरावर या महिलेचा मृत्यू झाला मनाबाई पोपट वारे असं या मृत महिलेचं नाव असून या घटनेची माहिती समजताच घारगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तिच्यासोबत असलेल्या बारा शेळ्या अजूनहि बेपत्ता आहेत तर या घटनेचा पुढील तपास पोलिसकरणार आहेत.
३. आर्थिक आणि दुर्बल घटकांना मदत
कर्जत तालुक्यामध्ये 17 हजार 360 लाभार्थ्यांना दोन कोटी 60 लाख वीस हजार सहाशे रुपयांचे अनुदान वाटप करण्यात येत आहे अशी माहिती तहसीलदार नानासाहेब आगळे यांनी दिली आहे राज्य शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग यांच्या अंतर्गत कोरोना काळामध्ये सर्वत्र लोकडाऊन आणि जनता कर्फ्यू यामुळे गोरगरीब नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
४. शेतकऱ्याच्या शेतात गांजाची झाडे
अकोले तालुक्यातील मेहेंदुरी गावाचा शिवारातील बहिरवाडी परिसरात पोलीस अधिकारी राहुल मदने पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी छापा टाकून शेतातील 12 ते 15 गांजाची यांची झाडे जप्त केली आहेत बहिरवाडी येथील रोहिदास रामभाऊ पथवे यांच्या शेतात ही कारवाई करण्यात आली उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या कार्यालयातील पोलिस कॉन्स्टेबल मेंगाळ यांनी ही कारवाई केलीय.
५. हनीट्रॅपधील आरोपी खेसेला 22 मेपर्यंत कोठडी
नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हनीट्रॅपमधील आरोपी सचिन खेसे (रा. हमीदपूर ता. नगर) याला पोलिसांनी बुधवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 22 मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. दरम्यान, हनीट्रॅप प्रकरणी अटक करण्यात आलेली तरुणी व तिचा एजंट मोरे यांच्या कोठडीची मुदत आज (गुरूवार) संपत असल्याने त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
६. कुचकामी यंत्रणेमुळे शेकडो करोनाबाधीत रुग्णांचे बळी
साईबाबा विश्वस्त व्यवस्थेच्या साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनाअभावी व गलथान व्यवस्थेमुळे माझ्या आजीचा मृत्यू झाला असून त्याबरोबरच शेकडो करोनाबाधीत रुग्णांचे बळी गेले असून येथील कुचकामी यंत्रणेला ठिकाणावर आणावे. त्याचबरोबर दोषींवर कडक कारवाई करावी अन्यथा लोकशाही मार्गाने व उच्च न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मागणार असल्याचे लेखी निवेदन संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक दशरथ गव्हाणे यांनी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांना दिले.
७. जन्मदात्या पित्याचा मुलांकडून निर्घुण खून
जन्मदात्या बापाचा सांभाळ कुणी करायचा या कारणावरुन दोघा मुलांमध्ये वाद झाला. या वादातूनच या दोघा मुलांनी बापाचा गळा दाबून खून केल्याची खळबळजनक घटना संगमनेर तालुक्यातील चिखली येथे शनिवार ते रविवारच्या सुमारास मध्यरात्री घडली. या प्रकरणी संशयीत आरोपी रामदास दशरथ माळीव अमोल दशरथ माळी यांच्या विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
८. मोरोक्को देशातून शिक्षकांसाठी मोफत आंतरराष्ट्रीय ऑनलाईन योग प्राणायाम शिबीर संपन्न
दक्षिण आफ्रिकेतील मोरोक्को देशातून आयुष मिनिस्ट्री आर्ट ऑफ लिव्हिंगच्या च्या योग टिचर रचनाताई फासाटे यांनी भारत देशातील आपल्या मायभूमीची सेवा करण्यासाठी अहमदनगर जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षिका, अधिकारी यांच्या आरोग्यासाठी मोफत आंतरराष्ट्रीय ऑनलाईन योग प्राणायाम शिबिर 11 मे पासून 16 मे पर्यंत आयोजीत केले होते.
९. नेवाशासह नगर जिल्ह्यासाठी युरिया खताचा साठा वेळेवर उपलब्ध करा
यावर्षी पाऊस भरपूर होण्याचा अंदाज असल्याने नेवासा तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर खरीप पिकांची पेरणी व लागवड होणार आहे. यामुळे खरीप पिकांसाठी मोठ्या प्रमाणावर युरिया खतांची मागणी असणार असेल. ही संभाव्य मागणी लक्षात घेता जलसंधारण मंत्री ना शंकरराव गडाख यांनी कृषीमंत्री ना. दादाजी भुसे यांची भेट घेऊन नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्याला खरीप पिकांसाठी आवश्यक असलेला युरिया खतांचा साठा वेळेवर उपलब्ध करून शेतकरी बांधवांना सहकार्य करणेबाबद एकत्रित बैठक घेत चर्चा केली.
१०. कुकडी डाव्या कालव्याच्या पाण्यासाठी पेटली मशाल
जवळा येथील महादेव मंदिरात कुकडीच्या हक्काच्या पाण्यासाठी न्यायालयीन लढा देण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी एकजुटीची शपथ घेऊन शेतकर्यांनी मशाल पेटवली. कुकडी पाटबंधारे प्रकल्पाचे पाणी वाटपात डाव्या कालव्यावरील लाभक्षेत्रातील शेतकर्यांवर गेल्या पंचवीस वर्षांपासून सातत्याने अन्याय होत आहे. या प्रकल्पातील धरणग्रस्तांचे पुनर्वसन पारनेर आणि श्रीगोंदा तालुक्यातच झाले आहे. डावा कालवा 175 किलोमीटर लांबीचा आहे, व प्रकल्पाचे लाभक्षेत्र जवळपास 70 टक्के आहे.
No comments
Post a Comment