मोठी बातमी - बोठे विरोधात होणार आणखी एक गुन्हा दाखल
News24सह्याद्री -
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार बाळ ज. बोठे याच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. पारनेर येथील कारागृहात कैद्यांकडे सापडलेल्या मोबाईलवरून आरोपी बाळ बोठे याने काही फोन केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये बोठे याला आरोपी करण्यात येणार असल्याची माहिती नगर ग्रामिणचे उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील यांनी दिली. गेल्या महिन्यात पारनेर उपकारागृहाची झडती घेतली होती. यावेळी कारागृहातील आरोपी सौरभ गणेश पोटघन व अविनाश निलेश कर्डिले यांच्याकडे अंगझडतीत दोन मोबाईल सापडले होते. आरोपी पोटघन आणि कर्डिले यांच्या कोठडीतच आरोपी बाळ बोठे याला ठेवलेले आहे.
यासंदर्भात पारनेर पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेखा जरे हत्याकांडाचा मुख्य सुत्रधार बोठे याने देखील या मोबाईलचा वापर केला असल्याचा संशय पोलिसांना होता. त्यादृष्टीकोनातून पोलिसांनी तपास केला असता बोठे याने देखील त्या मोबाईलचा वापर केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे बोठेला देखील कारागृहात मोबाईल वापरल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात आरोपी केले जाणार आहे. मोबाईलद्वारे त्याने कोणाला फोन केले, त्यातून काय संभाषण झाले याचा तपास पोलीस करत आहे.
No comments
Post a Comment