20 मे सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - कोरोनाच्या अहवालावर QR कोड बंधनकारक...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. अकरावीसाठी तात्पुरते प्रवेश द्या, परीक्षा नंतर घ्या
दहावीच्या विद्यार्थ्यांना शाळास्तरावर तात्पुरत्या स्वरूपात अकरावीमध्ये प्रवेश द्यावा आणि बारावीच्या परीक्षेच्या आधी म्हणजेच २ वर्षांच्या कालावधीत केव्हाही दहावी परीक्षेला बसून त्याचे प्रमाणपत्र प्राप्त करण्याची संधी द्यावी, असा पर्याय यूजीसीचे माजी उपाध्यक्ष व आयुषचे राष्ट्रीय संशोधन प्राध्यापक डॉ. भूषण पटवर्धन यांनी सुचविलाय
2. दगडी चाळीचा लवकरच दगडी टाॅवर होण्याची शक्यता
ज्या दगडी चाळीने भायखळ्याला ओळख मिळवून दिली त्या दगडी चाळीचा लवकरच दगडी टाॅवर हाेऊ शकताे, कारण दगडी चाळ पुनर्विकासाचा प्रस्ताव म्हाडाने स्वीकारला आहे.दगडी चाळीत दहा इमारती उपकर प्राप्त आहेत. चाळीने इमारतींच्या पुनर्विकासासाठीची परवानगी म्हाडाकडे मागितली आहे. म्हाडाने त्यांचा प्रस्ताव स्वीकारला.
3. कोरोनाच्या अहवालावर QR कोड बंधनकारक
कोरोना अहवालावर क्यूआर कोड नसल्यास आता विमान प्रवास करता येणार नाही. येत्या २२ मेपासून आंतरराष्ट्रीय प्रवाशांना हा नियम लागू केला जाणार आहे. कोरोना अहवालात फेरफार करून विमान प्रवास केला जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने केंद्रीय हवाई वाहतूक मंत्रालयाने उपरोक्त निर्णय घेतला आहे.
4. घरोघरी जाऊन लस देणार असाल तर केंद्राच्या परवानगीची वाट पाहू नका
लसीकरण केंद्रात येऊ न शकणाऱ्या वृद्ध व विकलांग व्यक्तींचे लसीकरण घरी जाऊन करणार का? असा सवाल उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला करत गुरुवारी याबाबत उत्तर देण्याचे निर्देश दिले.केंद्र सरकार घरोघरी जाऊन लस देण्याबाबत उदासीन आहे. जर मुंबई पालिका घरोघरी जाऊन लस देणार असेल तर केंद्र सरकारच्या परवानगीची वाट पाहात बसू नका.
5. कोरोना रुग्णाच्या मृत्यूनंतरही ३ दिवस उपचार
कोरोना काळात खासगी रुग्णालयात होत असलेल्या लुटीची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. परंतु बिलाची रक्कम येणे बाकी असल्याने मृत्यूनंतरही एका कोरोना रुग्णावर तब्बल तीन दिवस उपचार करण्याचा प्रताप नांदेडमधील गोदावरी हॉस्पिटलने केला आहे. मयताच्या पत्नीने या विषयाचा भंडाफोड केला असून, न्यायालयाच्या आदेशाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
६. राजस्थानचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ पहाडिया यांचे कोरोनामुळे बुधवारी निधन झाले
ते 93 वर्षांचे होते. सध्या त्यांच्या पत्नीवरही दिल्लीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काँग्रेसचे दिग्गज आणि ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची देशभरात ओळख होती.
7. दुसरी लाट जुलैपर्यंत थांबणार
भारतात कोरोनाची दुसरी लाट ही जुलैपर्यंत थांबेल आणि जवळपास सहा ते आठ महिन्यांनी पुन्हा कोरोना महामारीची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. हा अंदाज भारत सरकारच्या विज्ञान मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या विज्ञान आणि औद्योगिकी विभागाद्वारे स्थापन केलेल्या तीन सदस्यीय समितीने लावला आहे.
8. राजभवनसमोरील निदर्शनांची गंभीर दखल
राजभवनसमोर नियम मोडून सलग दोन दिवस सुरू असलेल्या निदर्शनांची गंभीर दखल पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी घेतली असून, याबाबत कोलकाता पोलिसांकडून अहवाल मागविला आहे.
9. गेल्या वेळ सारखी परिस्थीती येऊ देऊ नका
पुणे शहरात गेल्या तीन वर्षांतील पावसाची स्थिती लक्षात घेता कमी वेळात अधिक पाऊस असे प्रकार वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात मान्सून पूर्व कामे वेगाने सुरु असून त्यामध्ये सद्यस्थितीला समाधानकारक काम केले आहेत. तसेच उर्वरित कामे लवकरात लवकर पूर्ण करा, असे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत', अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
10. ग्रामीण बेरोजगारीमध्ये यंदा दुपटीने वाढ
कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा ग्रामीण भागावर परिणाम होत आहे. अनेक राज्यांनी लावलेल्या लॉकडाऊनमुळे बेरोजगारीत आठवडाभरातच दुपटीने वाढ झाली आहे. शहरी भागातही चित्र वेगळे नाही. कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे देशासमोर पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर बेरोजगारीचे संकट उभे राहिले आहे.
No comments
Post a Comment