Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - शहरासह उपनगरात कमी दाबाने पाणीपुरवठा

No comments

  News24सह्याद्री - शहरासह उपनगरात कमी दाबाने पाणीपुरवठा..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. यात्रा उत्सव रद्द करून युवकांनी केले रक्तदान  
कोरोनाचा पार्श्वभूमीवर नेप्ती येथील ग्रामदैवत श्री बिरोबा महाराजांचा यात्रा उत्सव रद्द करून युवकांनी रक्तदान केलं तर कोरोनातून बरे झालेल्या ग्रामस्थांनी प्लाज्मा दिला सामाजिक बांधिलकी जपत सौरभजपकर  मित्र मंडळाच्या वतीने गावात रक्तदान व प्लास्मा दान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ग्रामस्थांना मस्क  व सॅनिटायझरचे  वाटप देखील करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन युवा नेते अक्षय कर्डिले यांच्या हस्ते झाले त्या वेळी आमदार निलेश लंके युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष विजय औटी सरपंच मनोज कोकाटे प्रतिक कोतकर सुरेश शेळके बलभीम कर्डिले आदी उपस्थित होते

2. अमरधाम पोर्टल वरील नोंदीत फरक
 नगर शहरातील अमरधाम स्मशानभूमी व उपनगरातील तपोवन रोडवरील स्मशानभूमीमध्ये  सध्या कोरोनाच्या मृतांवर अंत्यसंस्कार होत आहेत जिल्ह्यात प्रत्यक्षात झालेल्या मृत्यू आणि पोर्टलवर नोंद झालेल्या मृत्यूच्या संख्येत आधी तब्बल 30 ते 40 संख्येची तफावत असायची ती तफावत आता कमी झाले आहे.

3. शहरासह उपनगरात कमी दाबाने पाणीपुरवठा
 मुळानगर पंपिंग स्टेशन येथील कार्यरत पैकी 725 अश्‍वशक्तीचा एक पंपसेट नादुरुस्त झालेला आहे पंप दुरुस्तीचे काम मनपाकडून तातडीने हाती घेण्यात आले आहे मात्र दुरुस्तीच्या कामाला अवधी लागणार आहे परिणामी शहरात वितरणासाठी आवश्यक पाण्याचा उपसा होण्यास अडथळे येत आहेत पण दुरुस्तीचे काम पूर्ण होऊन पूर्ण क्षमतेने पाणी उपसा पूर्ववत होईपर्यंत शहराच्या मध्यवर्ती भागासह  उपनगर भागात उशिराने व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

4. महापौर निवडणुकीसाठी राजकीय हालचाली
आगामी महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महापालिका वर्तुळात राजकीय घडामोडींना सुरुवात झाली आहे शिवसेनेकडून आगामी महापौर पदासाठी मोर्चेबांधणी सुरू आहे मात्र आता काँग्रेस कडून हालचालींना सुरवात झाली आहे काँग्रेस व भाजप नेत्यांमध्ये महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी महापालिकेत बैठक झाल्याने चर्चांना उधाण आल

5. रिक्षाचालकांच्या खात्यात दीड हजार रुपये जमा करण्याच्या प्रक्रियेला 22 मे पासून सुरुवात
राज्यातील परवानाधारक रिक्षाचालकांना कोरोनाकाळात दीड हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्याची प्रक्रिया येत्या शनिवारपासून  सुरु होत आहे. यासाठी रिक्षाचालकांना कोणतीही कागदपत्रे सादर करण्याची गरज नाही. रिक्षाचालकांनी ऑनलाईन प्रणालीवर त्यांचे वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक व आधार क्रमांकांची नोंद केल्यानंतर संगणक प्रणालीवर आपोआप माहितीची पडताळणी होऊन आधार क्रमांकाशी लिंक असलेल्या खात्यात दिड हजारांची मदत तात्काळ जमा केली जाईल. यासंदर्भातील निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली अलिकडेच मंत्रालयात झालेल्या बैठकीत  घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी शनिवारपासून सुरु होत आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *