Breaking News

1/breakingnews/recent

19 मे सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24सह्याद्री - देशात कोरोनाग्रस्तांचे आकडे पुन्हा वाढले...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. पंतप्रधान नरेंद्र मोदी वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी करणार
गेल्या तीन दिवसांपासून तौक्ते वादळाने गुजरात आणि दीवला झोडपून काढलं आहे. त्यामुळे या परिसराचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरात आणि दीवमधील नुकसानीचा आढावा घेण्यासाठी थोड्याच वेळात गुजरातला पोहोचत आहेत. गुजरातच्या भावनगर येथून ते हवाई पाहणी करतील
  
2. देशात कोरोनाग्रस्तांचे आकडे पुन्हा वाढले
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत चढउतार  पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या दिवशी देशात 24 तासाच्या कालावधीत तीन लाखांपेक्षा कमी नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. तरी आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत चार हजारांनी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कालच्या दिवसात 2 लाख 67 हजार 334 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. 
3. कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या खिशातून मोबाईल-दागिने चोरी
कोरोना संसर्गानंतर मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या खिशातील पैसे, दागिने, मोबाईलची चोरी झाल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. रुग्णालयात उपचारादरम्यान रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत रॅप करताना त्यांच्या मौल्यवान वस्तूंची चोरी केली जात असे. मृताच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्या दोन आरोपींना नागपुरात अटक करण्यात आली आहे.
  
4. सुलभ लसीकरण आणि अपव्यय टाळण्यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करेल : पंतप्रधान मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना परिस्थितीबाबत देशाच्या आठ राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 46 जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. "लसीकरण सुलभ करण्यासाठी आणि लस वाया जाऊ नये यासाठी केंद्र सरकार उपाययोजना करेल," असं आश्वासन पंतप्रधान मोदींनी या बैठकीत दिलं. तसंच मोठ्या धोरणांमध्ये स्थानिक नवकल्पनांचे स्वागत असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

5. लसीचा पहिला डोस घेत विराट सेना कोरोनाविरोधातील युद्धात एक पाऊल पुढे
कोरोनाला हरवत टीम इंडिया मैदानावर उतरण्यासाठी तयार आहे. विराट सेना कोरोनाशी अर्धी लढाई देशात लढणार आहे, तर अर्धी विदेशात. टीम इंडियाच्या खेळाडूंनी कोरोना लसीचा एक डोस घेतला आहे. परंतु, या सर्व खेळाडूंच्या दुसऱ्या डोसच्या वेळी ते इंग्लंडमध्ये असणार आहेत. टीम इंडिया 18 ते 22 जूनपर्यंत न्यूझीलंड विरोधात टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळण्यासाठी इंग्लंडला रवाना होणार आहेत. 

6. जेपी नड्डा आणि स्मृती इराणी यांच्याविरोधात FIR दाखल करा
 टूलकिट प्रकरणावरुन देशातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता असून भाजप आणि काँग्रेस या मुद्द्यावरुन आमने-सामने आल्याचं दिसून येतंय. टूलकिट प्रकरणावरुन आता भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तसेच भाजप नेते संबित पात्रा यांच्याविरोधात गुन्हा नोंद करावा अशी मागणी काँग्रेसने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे केली आहे. 

7. पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता घसरली,
देशात कोरोना च्या दुसऱ्या लाटेनं केवळ देशाचंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदीं च्या प्रतिमेचंही मोठं नुकसान केलंय असं दिसून येतंय. या काळात मोदींची लोकप्रियता घसरुन 63 टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे त्यांच्या देशा-विदेशातील 'शक्तिशाली नेता' या प्रतिमेला धक्का बसला आहे. अमेरिकन कंपनी असलेल्या मॉर्निंग कन्सल्टने जगभरातील काही नेत्यांच्या कोरोना काळातील लोकप्रियतेचा अभ्यास केला आहे. 

8. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती भिडल्या गगनाला
करोना संकट आणि तौते चक्रीवादळाच्या संकटात लोक महागाईच्या संकटाचा देखील सामना करत आहेत. दिवसेंदिवस देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर विक्रमी पातळी गाठत आहेत. मार्च-एप्रिलमध्ये किरकोळ इंधन दरामध्ये जास्त दरवाढ झाली नाही. परंतु आतापर्यंत मेमध्ये एकूण १० दिवस तेलाच्या किंमती वाढविण्यात आल्या. सर्व मेट्रो शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल विक्रमी दराने विकले जात आहेत. 

9. आंबा बागायतदारांचे १०० कोटी पाण्यात?
पहिल्या हंगामात फारसे उत्पादन नसल्यामुळे शेवटच्या हंगामावर भिस्त ठेवलेले कोकणातील आंबा बागायतदार तौक्ते चक्रीवादळात पूर्णत: होलपटले गेले आहेत. चक्रीवादळाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमधील आंबा बागायतदारांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेलाच, पण उत्पन्न देणारी झाडेही उन्मळून पडली आहेत. 

10. ५,२७६ नळजोडण्यांना जलमापके
पनवेल : पनवेलमधील पाणीप्रश्न कायम असून शहरासाठी २२५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. त्यामुळे पाणी वाया जाऊ नये म्हणून नळजोडण्यांना जलमापके बसविण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने तयार केला आहे. ५,२७६ नळांना जलमापके बसविण्याचा प्रस्ताव गुरुवारच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.




No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *