Breaking News

1/breakingnews/recent

19 मे सह्याद्री बुलेटिन

No comments

News24सह्याद्री भंडाऱ्यात सापडले म्युकरमायकोसिस चे ३ रुग्ण....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये





TOP HEADLINES


1. भंडाऱ्यात सापडले म्युकरमायकोसिस चे ३ रुग्ण
राज्यात गेल्या काही दिवसांपासून म्युकर मायकोसिस या आजाराची चर्चा सुरु असून, सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. या आजाराने, भंडारा जिल्ह्यात पाय रोवले असून, या आजाराचे तीन रुग्ण भंडारा येथे आढळून आल्याची धक्कादायक माहितीसमोर आली आहे. तिनपैकी दोघांना उपचारासाठी नागपूरला हलविण्यात आले.तर एक रुग्ण भंडाऱ्यात उपचार घेत आहे. 

२. आ.हितेंद्र ठाकूर यांनी घेतला वसई-विरार शहराचा आढावा
कोकण किनारपट्टीवर आलेले तौक्ते चक्रीवादळ आणि त्यांने केलेल्या नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी बुधवारी वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी वसई-विरार शहराची पाहणी करून आढावा घेतल्याची माहिती आजीव पाटील यांनी दिली. दोन दिवसांपूर्वी कोकण किनारपट्टीवर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळचा वसईच्या किनारपट्टीलाही जोरदार तडाखा बसल्याचे पाहायला मिळाले होते. 

३. कुलदीप यादवला गेस्ट हाऊसवर कोरोना लस
लसीकरण केंद्रावर गर्दी करुनही लसीच्या कमतरतेमुळे लोकांना लस मिळत नाही. अशी सगळी परिस्थिती असताना भारतीय संघातल्या एका क्रिकेटपटूला लसीकरणासंबंधी असलेल्या सरकारी नियमांतून सूट मिळाली की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याचं कारण म्हणजे भारतीय संघाचा फिरकीपटू कुलदीप यादवने गेस्ट हाऊसच्या हिरवळीवर लस टोचून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. 

४. जयंत पाटील यांनी दिला अलर्ट
यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रात पूरस्थिती निर्माण होऊ नये म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील अ‍लर्ट झाले आहेत. त्यामुळे त्यांनी आज पूरस्थितीचा आढावा घेतला. संभाव्य पूरस्थिती रोखण्यासाठी प्रशासनाने काय तयारी केली.

५. उद्धव ठाकरे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री : संजय राऊत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत सक्षम मुख्यमंत्री आहेत. ते कोणत्याही संकटाशी सामना करु शकतात, ही गोष्ट कदाचित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उमगली असेल. त्यामुळेच तौक्ते चक्रीवादळानंतर पंतप्रधान मोदी  महाराष्ट्रात न येता फक्त गुजरातच्या दौऱ्यावरच गेले असावे, अशी टिप्पणी संजय राऊत  यांनी केली. ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

६. छत्रपती संभाजीराजे यांनी मांडली भूमिका
मराठा आरक्षणाबाबत कोर्टाच्या निर्णयावर समाजात सर्वत्र नाराजी आणि अस्वस्थता आहे. समस्येवर मार्ग निघण्यासाठी मी सकारात्मक आहे. आरक्षणाबाबत मार्ग निघेपर्यंत मी गप्प बसणार नाही. छत्रपती संभाजीराजे यांनी पुण्यात माध्यमांसमोर अशी भूमिका मांडली आहे. कालच संभाजीराजे यांनी ट्विट करून आपण लवकरच मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले होते. 

७. फडणवीस तीन दिवसांच्या कोकण दौऱ्यावर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तीन दिवसांचा कोकण दौरा करणार आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळामुळे मोठं नुकसान झालं आहे. वादळामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी फडणवीस तीन दिवसीय कोकण दौऱ्यावर आहेत. 

८. उजनीच्या पाण्यावरून वाद
उजनी धरणातील पाण्याचा आदेश रद्द करण्यात आलाय. स्वतः राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी हा निर्णय घेतलाय. उजनी धरणातील पाणी इंदापूरला वळवले जात असल्याचा आरोप होत होता. यावरुन इंदापूचे आमदार तथा सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या विरोधात सोलापुरात अनेक आंदोलनंही झाली. सोलापुरातल्या लोकप्रतिनिधींनीही याला मोठा विरोध केल्यानंतर जयंत पाटील यांनी उजनीच्या पाण्याविषयीचा आदेश रद्द केला. इंदापूर तालुक्यात नागरिकांनी रास्ता रोको केला. 

९. पुणे म्युकर मायकोसिसचा हॉटस्पॉट
कोरोनाच्या संकटाशी झुंज सुरू असतानाच आता म्युकर मायकोसिसने राज्यात थैमान घातले आहे. पुणे जिल्हा तर म्युकर मायकोसिसचा हॉटस्पॉट ठरला असून पुण्यात आतापर्यंत या आजाराने 20 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासन खडबडून जागं झालं असून रुग्णालयांसाठी नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.राज्यात पुणे जिल्ह्यात म्युकर मायकोसिसचे सर्वाधिक रुग्ण आहेत. 

१०. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकण दौऱ्यावर
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. येत्या शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकणात जाणार असून तौक्ते वादळामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.कोकणातील नुकसानीची पाहणी केल्यानतंर उदय सामंत यांनी येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही कोकणात येऊन नुकसानीची पाहणी करणार असल्याचं सांगितलं. मुख्यमंत्र्यांचा हा दौरा दोन दिवसांचा असेल. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *