Breaking News

1/breakingnews/recent

19 मे सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

 News24सह्याद्री - 1 कोटी 53 लाख रुपयांचा ऑक्सीजन प्रकल्पास मंजुरी...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES

1. श्रीरामपुरात म्युकरमायकोसिसचे 5 तर राहात्यात 4 रूग्ण
श्रीरामपूर तालुक्यात म्युकरमायकोसिस या आजाराने प्रवेश केला असून तालुक्यात 5 तर राहाता तालुक्यात 4 रुग्ण आढळून आले आहेत. यातील एका रुग्णावर येथील साखर कामगार रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली असून ती यशस्वीही झाली असल्याची माहिती तालुका आरोेग्य अधिकारी डॉ. मोहन शिंदे यांनी दिली.

2. राहात्यातील लाचखोर मंडल अधिकार्‍यास रंगेहाथ पकडले
वडिलांनी खरेदी केलेल्या शेत जमिनीची 7/12 वर नाव लावायला 3 लाखांची मागणी केली होती. त्यातील 2 लाख रुपयांची रक्कम स्विकारताना नाशिकच्या लाचलुचपत पथकाने राहाता येथील मंडलअधिकारी जगन्नाथ आसाराम भालेकर यास 2 लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  
3. 1 कोटी 53 लाख रुपयांचा ऑक्सीजन प्रकल्पास मंजुरी
कोव्हीड संकटात मोठ्या प्रमाणात भेडासवलेल्या ऑक्सीजन तुटवड्यावर कायम स्वरुपी मार्ग काढण्यासाठी माजीमंत्री आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे राहाता येथील ग्रामीण रूग्णालयात सुमारे 1 कोटी 53 लाख रुपयांचा ऑक्सीजन प्रकल्प उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
  
4. मराठा आरक्षण लढाईत महाविकास आघाडी सरकारकडून कुचराई
आरक्षण हा राज्यातील मराठा समाजाच्या विकासाचा व समाजातील तरुणांच्या भवितव्याचा मुद्दा असतानाही महाविकास आघाडी सरकारने कायदेशीर लढाईत कुचराई केल्याचा आरोप भाजपचे आ. बबनराव पाचपुते यांनी केला आहे. 

5. कोपरगाव पालिकेच्या वरच्या मजल्याचे काम लागणार मार्गी : आ. आमदार काळे
काेपरगाव नगर परिषदेच्या प्रशासकीय इमारतीचे काम पूर्ण व्हावे, यासाठी वैशिष्टपूर्ण योजने अंतर्गत २ कोटी रुपये निधी मंजूर करून कोपरगाव नगरपरिषदेकडे वर्ग करण्यात आला. कोपरगाव नगरपरिषदेच्या इतर निधीतून आवश्यक असणाऱ्या निधीच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळावी, यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव नगरपरिषदेस ४.१९ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली. 

6. घरफोडी करून पैसे दागिने, चोरले
जामखेड तालुक्यातील जवळा येथे चोरट्यांनी घरफोडी करून ७५ हजार रुपयांची रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ११ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. १३ ते १४ मे दरम्यान ही घटना घडली. याप्रकरणी जामखेड पोलिस ठाण्यात दयानंद सुभाष कथले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

7. पाचपुतेंच्या मीपणामुळे कुकडीचे आवर्तन लांबले
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कुकडी आवर्तन यासंदर्भात याचिकाकर्ते प्रशांत आवटी यांचे मन वळविले होते पण आमदार बबनराव पाचपुते यांनीही गुप्त खलबते प्रसिद्धीला दिली पाचपुते यांचा मी पणा आणि प्रसिद्धीमुळे कुकडीचे आवर्तन आठ दिवस लांबले असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी  श्रीगोंदा येथे पत्रकारांशी बोलताना केला

8. खते महागल्याने शेती व्यवसाय अडचणीत
खरीप हंगाम सुरू होण्याआधीच रासायनिक खतांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे खत कंपन्यांकडून दरवाढ होणार नाही असे सांगूनही दरवाढ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी नाराजी व्यक्त करण्यात येत आहे देशभरात असलेल्या कोरोना  आजार, लॉकडाउन, वाढलेली रुग्ण संख्या, शेतीमालास मिळत नसलेला दर, यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना येत्या खरीप हंगामात रासायनिक खतांच्या दरवाढीमुळे
आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार आहे.

9. टोमॅटो,कांदा उत्पादकांचे होणार नुकसान
कोरोनाचा  वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या एकोणवीस तारखे पासून 31 मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे त्यात संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती सुद्धा बंद राहणार आहे त्यामुळे तालुक्यातील टोमॅटो आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे  मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे त्यामुळे आता या शेतमालाचे करायचे काय असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे.

10. शेवगाव तालुक्यात कोरोना काळातही पशुधनाचे लसीकरण सुरूच
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र पशुवैद्यकीय सेवा अत्यावश्यक सेवेत मोडत असल्याने तालुक्यात कोरोना काळातही पशुधनाच्या वैद्यकीय उपचारासोबतच लसीकरणाची मोहीम नियमितपणे सुरू आहे. त्यामुळे पशुधनाच्या आरोग्याची काळजी घेतली जात आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *