Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत

No comments

 News24सह्याद्री - विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES

1. बालकांच्या संरक्षणार्थ टास्क फोर्स
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील आणि जिल्ह्यातील बालकांची काळजी आणि संरक्षणासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स स्थापन करण्यात आला आहे. कोरोनाच्या  संसर्गामुळे ज्या पाल्याने पालक गमावले आहेत. त्यांना संरक्षण मिळावे तसेच ही बालके शोषणास बळी पडू नये, अथवा अशी मुले तस्करी सारख्या गुन्ह्यात ओढली जाऊ नयेत, याची दक्षता शासनातर्फे घेतली जात आहे. 

2. किराणा भाजीपाला फळ विक्री सुरू करा
कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्तांनी आजपासून नगर शहरातील किराणा दुकान उघडण्यास तसेच भाजीपाला फळे विकण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे सामान्य लोकांना या सर्व वस्तू जास्त पैसे देऊन घ्यावे लागत आहे. लोकांना मोठा आर्थिक फटका त्यात महागाईने सामान्य लोकांचे जगणे मुश्किल झाले आहे. 

3. विद्युत पुरवठा खंडित झाल्याने पाणीपुरवठा विस्कळीत
वादळी वाऱ्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणार्‍या पाणी योजनेवरील विद्युत पुरवठा सोमवारी दुपारी बारा वाजे नंतर खंडित झाला होता त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे सध्या सोसाट्याचा वारा वाहत असल्याने विद्युत पुरवठा खंडीत होत असून त्याचा परिणाम शहराच्या पाणीपुरवठ्यावर होत आहे त्यामुळे उपनगरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून नागरिकांनी  पाण्याचा काटकसरीने वापर करावा असे आवाहन महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केले.

4. वाईन शॉप सुरु पण शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीस बंदी
2 मे पासून सलग 15 मे पर्यंत शेतमाल भाजीपाला विक्रीबंदी लागू केलेले आहे. ही बंदी शेतकरी आणि शहरातील लहान मुले गरोदर महिला आणि आजारी नागरिक यांच्यावर अन्यायकारक आहे. याप्रश्नावर आणि शेतमाल भाजीपाला खरेदी केंद्र सुरू करत मनपा हद्दीतील नागरिकांना पुरविण्याचा उपाय करण्याचे ही सूचना सुचविले होते. परंतु आपण दुर्लक्ष करीत आहात.अशी मागणी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने  करण्यात आली आहे. मनपा हद्दीत फेरफटका मारला तर लक्षात येईल की आपल्या निर्णयामुळे शहरात वाईन शॉप सुरु आहेत पण शेतकऱ्यांना भाजीपाला विक्रीस बंदी आहे.

5. मनपा चे नवीन आदेश कोरोना चाचणी बंधनकारक
शहरात लागू केलेल्या कडक निर्बंधतून सवलत मिळालेल्या अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांना कोरोणा टेस्ट करण्यासाठी बंधनकारक करण्यात आला आहे. महापालिकेच्या पथकामार्फत त्यांचे चेकइन केले जाणार आहे आयुक्त शंकर गोरे यांनी मंगळवारी तसे आदेश काढले आहे. रविवारी आयुक्तांनी आदेश काढत नगर शहरातील किराणा दुकाने, मटन चिकन विक्री करणारे दुकाने, एक जून पर्यंत बंद केले. पूर्वीच्या निर्बंधात शिथिल केल्यानंतर खरेदीसाठी नगरकरांनी केलेली गर्दी पाहता आयुक्तांनी कडक निर्बंध काढले. मेडिकल, हॉस्पिटल, पेट्रोल पंप, गॅस वितरण, बँका, डेरी पशुखाद्य आणि कृषी सेवा केंद्रांना सवलत देण्यात आली आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *