Breaking News

1/breakingnews/recent

11 मे सह्याद्री वेगवान आढावा

No comments

 News24सह्याद्री - गोव्यात जाणाऱ्यांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य....पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES

१ उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी; इमारत जमीनदोस्त
कोरोना संकटाशी दोन हात करत असतानाच उत्तराखंडमध्ये आरोग्य सुविधांचा जाणावरा तुटवडा प्रशासनापुढे आव्हानाची परिस्थिती उभा करुन गेला. त्यातच आता आणखी एक संकट इथं धडकलं आहे. हे संकट आहे ढगफुटीचं. उत्तराखंडमध्ये पुन्हा एकदा मंगळवारी ढगफुटी झाल्याचं निदर्शनास आलं. देवप्रयाग येथे झालेल्या या ढगफुटीसदृश पावसामुळं इमारती जमीनदोस्त झाली.

२. भारत बायोटेकच्या Covaxin लसीची 2 ते 18 वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस
कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना लागण होण्याचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं. कोरोना महामारीविरोधातील या लढाईत आता मुलांसाठी येत्या काही दिवसात चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. एका तज्ज्ञ समितीने मंगळवारी भारत बायोटेकची कोवॅक्सिन या स्वदेशी कोरोना प्रतिबंधक लसीची 2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांवर चाचणीसाठी शिफारस केली आहे. दुसऱ्या/तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी ही शिफारस करण्यात आली आहे. 

३. गोव्यात जाणाऱ्यांसाठी आरटी-पीसीआर निगेटिव्ह अहवाल अनिवार्य
तुम्ही गोव्याला जाण्याचा प्लान केला असेल तर तुम्हाला कोविड निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र बरोबर ठेवावं लागणार आहे. हे प्रमाणपत्र नसेल तर गोव्यात प्रवेश करता येणार नाही, असे आदेश गोवा सरकारने काढले आहेत. मात्र आपण गोव्याचे रहिवाशी असाल तर त्याचा पुरावा देऊन तुम्ही गोवा राज्यात प्रवेश करू शकता. तसेच तुम्ही एखाद्या कामाकरता गोव्यात जात असाल तर त्या संबंधित कार्यालयाचे पत्र आपल्याकडे असणं आवश्यक आहे. 

४. लसीच्या तुटवड्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य द्या [लसीकरण]
 कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण कार्यक्रम देशात जोरात सुरू आहे. मात्र लसीकरण मोहिमेत सर्वात मोठी अडचण ठरत आहे ती म्हणजे पुरेशा कोरोना लस डोसची उपलब्धता नसणे. दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना राज्य सरकारने प्राधान्य दिले पाहिजे.

५. कोरोना काळात पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थानाचं काम जोरात,
सेंट्रल विस्टा...देशात सगळीकडे कोरोनाचं थैमान सुरु असताना दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मात्र या प्रकल्पाची जोरदार चर्चा सुरु आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचं नवं निवास्थान, एकाच ठिकाणी सर्व मंत्रालयं, उपराष्ट्रपती निवास, एसपीजी मुख्यालय अशा सगळ्या इमारती या सेंट्रल विस्टा अंतर्गत उभारण्यात येणार आहेत. देशात कोरोनामुळे लॉकडाऊन असताना दिल्लीत मात्र इंडिया गेट, राजपथावरच्या हिरवळीवर सध्या या प्रकल्पाचं काम जोमात सुरु आहे. 

६. तेलंगणात उद्यापासून 10 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर,
 तेलंगणा राज्यात उद्या सकाळी दहा वाजल्यापासून लॉकडाऊन लागू होणार आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर ही घोषणा केली. तेलंगणातील लॉकडाऊन हा तब्बल दहा दिवसांचा म्हणजे 21 मे पर्यंत लागू असणार आहे. राज्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी होणार असली तरी दारुविक्री मात्र मर्यादित वेळेत सुरु राहणार आहे, राज्यातील दारु विक्री दुकानांना सकाळी 6 ते सकाळी 10 वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. 

७. कोरोनातून बरे झाल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन पुन्हा तिहार तुरुंगात
कोरोना संसर्गामधून पूर्णपणे सावरल्यानंतर अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनला तिहार तुरुंगात परत पाठवण्यात आले आहे. छोटा राजन यांना मंगळवारी एम्समधून डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर त्याला पुन्हा तिहार तुरुंगात पाठविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितले.

८. स्टेट बँकेत 5 हजार जागांवर भरती
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक म्हणून ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये क्लार्क केडरमधील ज्युनिअर असोसिएटस पदासाठी भरती प्रक्रिया सुरु आहे. स्टेट बँकेत तब्बल 5 हजार पदांसाठी भरती होणार आहे. बँकेत नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी ही चांगली संधी आहे. एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन इच्छुक उमेदवार अर्ज करु शकतात. अर्ज करण्यासाठी स्टेट बँकेने 17 मे हा दिनांक निश्चित केला आहे.

९. देशात कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा वाढली
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात साडेतीन लाखांहून कमी नवीन रुग्ण सापडले आहेत. मात्र आदल्या दिवशीच्या तुलनेत रुग्णसंख्येत जवळपास 19 हजारांनी वाढ झाली आहे. कालच्या दिवसात 3 लाख 48 हजार 421 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर तब्बल 4 हजार 205 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले. 

१०. मुंबई उच्च न्यायालयातील वकिलांसाठी खास लसीकरण मोहीम
मुंबई उच्च न्यायालयातील वकिलांसाठी विशेष कोरोना लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या विशेष मोहीमेसाठी 1 हजार लसी उपलब्ध करून देण्याची कबूली मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी दिली आहे. मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता, न्यायमूर्ती शिंदे आणि बॉम्बे बार असोसिएशनसह इतर वकिल संघटनांचे प्रतिनिधी यांच्यात एक बैठक पार पडली.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *