Breaking News

1/breakingnews/recent

12 मे सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

News24सह्याद्री - मंत्री गडाखांच्या पुढाकारातून साकारतोय ऑक्सिजन प्रकल्प...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  
TOP HEADLINES

1. राहाता बाजार समितीत 16 हजार गोणी कांद्याची आवक
राहाता बाजार समितीत काल मंगळवारी 16 हजार 40 गोणी कांदा आवक झाली. एक नंबर कांद्याला 1 हजार ते 1400 इतका भाव प्रतिक्विंटलला मिळाला. राहाता बाजार समितीत करोनाच्या काळातही शेतीमालाची चांगली आवक होत आहे. सोशल डिस्टंशिंगची काळजी घेतली जात आहे. या बाजार समितीतील सुरु असलेल्या व्यवहारामुळे तालुक्यातील तसेच तालुक्याबाहेरील शेतकर्‍यांना मोठा आधार मिळाला आहे. 

2. प्रवरा कोविड सेंटरला  अडिच लाखांची मदत
कोणत्याही संकटात समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची परंपरा प्रवरा परिवाराने नेहमीच जोपासली. सहकारी संस्थांनी पुढे येऊन दिलेले मदतीचे योगदान कोविड संकटाची लढाई जिंकण्यात महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या प्रवरा कोविड केअर सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल होत.

3. सोयाबीन बियाणे व खताची टंचाई जाणवणार नाही याची खबरदारी घ्या
या  वर्षी अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टर सोयाबीन पिकाचे नुकसानझाल्यामुळे यावर्षी सोयाबीन बियाण्यांची टंचाई जाणवणार आहे. लॉकडाऊनमुळे रासायनिक खतांचा पुरवठा वेळेत झाला नाही. खतांचा देखील तुटवडा निर्माण होवू शकतो. या शक्यता गृहीत धरून जिल्हा कृषी अधीक्षक व महाबीजने समन्वय ठेवून कोपरगाव तालुक्यात सोयाबीन बियाणे व खताची टंचाई जाणवणार नाही.

4. मुळा उजव्या कालव्यातून ७०० क्युसेकने आवर्तन
मुळा उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रासाठी मंगळवारी सकाळी ६ वाजता पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले. उन्हाळी हंगामातील शेवटचे पाणी आवर्तन वेळेत सुटल्याने लाभक्षेञातील शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
राहुरी, नेवासे, पाथर्डी, शेवगाव या मुळा उजव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली होती. 

5. 'त्या' डॉक्टरला समक्ष उपस्थित राहून खुलासा सादर करण्याचे आदेश
 देशी दारूचा काढा कोरोना आजारावर उपयुक्त असल्याचा दावा करीत देशी दारूची (३० एमएल) मात्रा देऊन ५० पेक्षा अधिक रुग्ण बरे केल्याची पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्या बोधेगाव येथील डॉक्टरला शेवगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामेश्वर काटे यांनी नोटीस बजावली आहे. काटे यांनी २४ तासांत खुलासा सादर करण्याचे, तर तहसीलदार अर्चना पागिरे यांनी समक्ष येऊन खुलासा देण्याचे आदेश दिले आहेत.कोरोना रुग्णांना ३० एमएल देशी दारू व त्याच प्रमाणात पाणी एकत्र करून दिल्यास कोरोना आजार बरा होतो.

6. आमदारांच्या बैठकीत कुकडीच्या आवर्तनावर सकारात्मक निर्णय
मुंबई उच्च न्यायालयाने कुकडीच्या आवर्तनाला दिलेल्या स्थगितीबाबत मंगळवारी मुंबईत जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्यासोबत कुकडी लाभक्षेत्रातील आमदारांची बैठक झाली. या बैठकीत पाणी सोडण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याचे सांगण्यात येते. जयंत पाटील यांनी याचिकाकर्ते प्रशांत औटी यांचे मन वळवून शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न सोडविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

7. गळा चिरून अकरा वर्षाच्या मुलाचा खून
अकरा वर्षाच्या मुलाच्या मानेवर विळी च्या सहाय्याने वार करून त्याचा खून करण्यात आला  खुंटेफळ येथे ही घटना घडली पित्याने दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सार्थक अंबादास शेळके असे वृत्त मुलाचे नाव आहे.

8. बेस्टच्या कामातून नगरला वगळण्यासाठी  प्रयत्न - आ . विखे
राज्य परिवहन महामंडळामध्ये सुरू असलेल्या मुंबईतील बेस्टच्या कामातून नगर विभाग वगळण्याच्या मागणीसाठी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे पाठपुरावा करून न्याय मिळवून देण्याची ग्वाही आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी संगमनेर आगारातील कामगारांच्या शिष्टमंडळाला दिली आहे.

9. मंत्री गडाखांच्या पुढाकारातून साकारतोय ऑक्सिजन प्रकल्प
 नेवासे फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात तातडीने ऑक्सीजन प्लांट उभा राहणार असून त्यादृष्टीने राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी प्रशासनाला याबाबत सूचना दिल्या  असल्याने लवकरच नेवासा तालुक्यातील ऑक्सिजन पुरवठ्या बाबतचा  मोठा गंभीर प्रश्न मंत्री गडाख यांच्या प्रयत्नामुळे सुटणार आहे नेवासा फाटा येथील ग्रामीण रुग्णालयात होत 

10. अकोले तालुक्यात लसीचा पुरवठा करावा - पिचड
अकोले तालुका साठी कोविशील्ड आणि कोव्याक्सिन लसीचा पुरवठा पुरेशा प्रमाणात करावा तसेच आदिवासी भागातील सर्वांचे  लसीकरण व्हावे यासाठी माजी आमदार वैभव पिचड यांनी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र पाठविले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *