Breaking News

1/breakingnews/recent

गॉसिप कल्ला - भूमी पेडणेकर बनली क्लायमेट वॉरिअर

No comments

   News24सह्याद्री भूमी पेडणेकर बनली क्लायमेट वॉरिअर..पहा गॉसिप कल्ला मध्ये




TOP HEADLINES


1. 'काळोखाच्या पारंब्या'ची ब्रूकलिन फिल्म फेस्टीव्हलसाठी निवड. 

अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'काळोखाच्या पारंब्या' चित्रपटाची न्यूयॉर्क येथे होणाऱ्या २४व्या ब्रूकलिन फिल्म फेस्टीव्हलसाठी निवड झाली असून ४ ते १३ जून कालावधीत हा फेस्टीव्हल होणार आहे ९३ देशांतून आलेल्या २५०० चित्रपट निवडीच्या स्पर्धेत होते..प्रख्यात लेखक भारत सासणे यांच्या 'डफ' या दीर्घकथेवर हा चित्रपट आधारित आहे.


2. चित्रपट श्रेणीत मुंबईचा गौरव

चित्रपटांचे माहेरघर असलेल्या मुंबई शहराचा जागतिक स्तरावर नावलौकिक आहे. चित्रपट निर्मितीत हे शहर अग्रगण्य असून सर्वात मोठी चित्रपटनगरी म्हणून मुंबईची ओळख आहे. याची दखल आता संयुक्त राष्ट्रसंघाने (युनेस्को) घेतलीय. येथील शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक परिषदेत सृजनशील संलग्न शहरामध्ये मुंबईचा चित्रपट श्रेणीमध्ये समावेश करण्यात आला आहे.


3. तिचं स्मशान होईल असं कधीच वाटलं नव्हतं

सध्या कोरोनामुळे वाढलेल्या मृत्युने स्मशानभुमीत मृतदेहाची रांग लागल्याचे विदारक दृष्य पाहायला मिळालं. नुकतेच  दिल्लीत कोरोनामुळे मृत्युमुखी पडणा-यांची संख्या वाढत असताना बागेचे रुपांतर स्मशानभूमीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.अभिनेता हेमंत ढोमेने याविषयी दुःख व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. 

4. ध्रुव वर्माचा 'द गुड महाराजा' १७ डिसेंबर, २०२२ला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
अभिनेता ध्रुव वर्माने पहिल्या इंडोपोलिश सिनेमा नो मीन्स नोमध्ये काम केल्यानंतर आता तो द गुड महाराजा या चित्रपटात झळकणार आहे आणि तेही मुख्य भूमिकेत. हा चित्रपट जगातील दुसऱ्या महायुद्धावर आधारीत आहे. विशेष बाब म्हणजे ध्रुव वर्माने या चित्रपटासाठी कमी मानधन घेतले आहे. 

5. भूमी पेडणेकर बनली क्लायमेट वॉरिअर
बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकर हिनं आपल्या दमदार अभिनय कौशल्यातून बॉलिवूडमध्ये स्वत:चं असं खास स्थान निर्माण केलं आहे. विविध विषयांवर आपली रोखठोक मतं मांडण्यातही ती पुढे असते. काही दिवसांपूर्वीच भूमी पेडणेकरला करोनाची लागण झाली होती. कोरोनामुक्त झाल्यानंतर लगेचच तिने एक छोटीशी मोहीम राबवण्याचं ठरवलं. जास्तीत जास्त प्लाझ्मा दान करणारे लोक, औषधे पुरवणारे या सर्वांना लोकांशी जोडून देण्याचा प्रयत्न ती करत आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *