Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - जिल्ह्यात रुग्ण संख्येची वाढ कायम

No comments

     News24सह्याद्री -

जिल्ह्यात काेराेनाविरुद्धचा लढा तीव्र सुरू आहे. रुग्ण वाचविण्याची धडपड आराेग्य यंत्रणा करत आहेत. सकारात्मक चित्र उभे राहत असतानाच नकारात्म चित्र पुढे येत आहे. असे असले, तरी नगरकरांनी काेराेनाविरुद्धच्या लढाईत एक संधपणा ठेवल्यास ही लढाई जिंकणे साेपे हाेणार आहे. यातच गेल्या 24 तासाच 2 हजार 935 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. नगर शहरात सर्वाधिक रुग्णसंख्या आढळली. 657 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले.

नगर शहरापाठाेपाठ नगर तालुक्यात सर्वाधिक रुग्ण आहे. नगर तालुक्यातील 307 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. राहाता, श्रीगाेंदे, संगमनेर या तालुक्यात दाेनशेच्या पुढे रुग्णसंख्या आहेत. नेवासे, पारने, पाथर्डी, श्रीरामपूर, काेपरगाव, शेवगाव, जामखेड, राहुरी या तालुक्यांमध्ये शंभरच्या पुढे रुग्णसंख्या गेली आहे. कर्जत, भिंगार शहर, अकाेले येथे रुग्णसंख्या कमी आढळली आहे.

अहमदनगर शहर : 657, राहाता : 260, संगमनेर : 247, श्रीरामपूर : 110, नेवासे : 100, नगर तालुका : 307, पाथर्डी : 105, अकाेले : 11, काेपरगाव : 111, कर्जत : 78, पारनेर : 103, राहुरी : 198, भिंगार शहर : 75, शेवगाव : 128, जामखेड : 153, श्रीगाेंदे : 238, इतर जिल्ह्यातील : 42,  इतर राज्य : 00, मिलिटरी हॉस्पिटल : 12 यांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे. जिल्हा रुग्णालयातील प्रयाेगशाळेनुसार 794, खाजगी लॅबनुसार 1 हजार 242 आणि रॅपिड चाचणीमध्ये 899 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *