मोठी बातमी - वर्षभराचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा बाळासाहेब थोरातांचा निर्णय
News24सह्याद्री -
देशभरात कोरोना संकट हे मोठ्या संख्येने वाढत आहे याच पार्शवभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपलं वर्षभराचं मानधन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत अशी घोषणा केलीये. तर याच बरोबर काँग्रेसचे 53 आमदार देखील त्यांचा महिन्याभराचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करणार आहेत.राज्यात दिवसागणिक कोरोनाचा प्रादूर्भाव वाढताना दिसत आहे. दरम्यान दिवसेंदिवस वाढणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येमुळे आरोग्य यंत्रणेवरही ताण आला आहे. कोरोना संकट आणि राज्यात घेण्यात आलेल्या सरसकट मोफत लसीकरणाच्या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडणार होता त्यामउळे हा निधी मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये देणार आहोत असं बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलाय.
No comments
Post a Comment