Breaking News

1/breakingnews/recent

कार्तिक आर्यनला करण जोहरने 'दोस्ताना 2'मधून का काढले कारण आले समोर

No comments


मुंबई -

कारण जोहरने दोस्ताना २ मधून कार्तिक आर्यनला बाहेर काढले होते त्याचे कारण समोर आले आहे. अभिनेता कार्तिक आर्यन आज बी-टाऊनमधले एक मोठे नाव बनले आहे आणि त्याने एकामागून एक अनेक हिट सिनेमाच काम केले आहे. पण सध्या कार्तिक एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. कार्तिकला धर्मा प्रॉडक्शनच्या 'दोस्ताना 2'मधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.

यासाठी करण जोहरला सोशल मीडियावरही ट्रोल केले जात गेले. आता कार्तिकने सिनेमा सोडण्याचे खरे कारण समोर आले आहे. ईटी टाईम्सच्या रिपोर्टनुसार, कार्तिक आर्यनला गेल्या वर्षी लॉकडाउनच्या आधी 2-3- कोटी रुपये मानधन देईन या चित्रपटासाठी साइन केले होते. नंतर त्याची ब्रँड व्हॅल्यू वाढली आणि त्याने अधिक मानधन मागितले. कार्तिक आर्यनची ब्रँड व्हॅल्यू 10 कोटींवर गेली आणि त्यांनी निर्मात्यांकडे ही मागणी केली होती.

दोस्ताना 2 बद्दल बर्‍याच दिवसांपासून चर्चा सुरू होती, पण कोरोनामुळे सिनेमाचे शूटिंग लांबणीवर पडले आणि या दरम्यान कार्तिकनेही अनेक हिट फिल्म्स दिली. करिअरचा आलेख वाढता पाहून कार्तिकनेही या चित्रपटासाठी मोठी रक्कम मागितली, यावर करण जोहर अजिबात खूष नव्हता. याशिवाय कार्तिकच्या या अनप्रोफोशनल वागणुकीला घेऊन देखील तो नाराज होता. एवढेच नाही तर करण जोहरनेकार्तिक आर्यनला सोशल मीडियावर देखील अनफॉलो केले आहे.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *