Breaking News

1/breakingnews/recent

मोठी बातमी - खासदार विखे पाटलांचा ‘विळद घाट’ अनेकांना ठरला आधार

No comments

   News24सह्याद्री खासदार विखे पाटलांचा ‘विळद घाट’ अनेकांना ठरला आधार
न्युरोसर्जन असणार्‍या विखे पाटलांचा आधार
जीव वाचविण्यासाठी घेतला पुढाकार
मदत आणि आधार देण्याची ही वेळ- विखे पाटील
अनेकांना मिळाले रेमडीसीवर
सर्वांनी मिळून कोरोनावर मात करू या- विखे पाटील
कोरोना संसर्ग वाढत असताना अनेकांचा जीव टांगणीला लागला आहे. रुग्ण संख्या वाढत चालली असताना हॉस्पिटलमध्ये बेड मिळायला तयार नाही. बेड मिळालाच तर इंजेक्शन भेटायला तयार नाही. सारेच हतबल झाले आहेत. लोकप्रतिनिधी म्हणजेच आमदार, खासदार याबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करीत आहेत. मात्र, मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी अवस्था आहे. या परिस्थितीत न्युरोसर्जन असलेले नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील हे अपवाद ठरले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी रेमडीसीवरचे तीनशे व्हेल्स म्हणजेच इंजेक्शन थेट दिल्लीहून खास विमानाने आणले आणि गरजूंना मोफत वाटले. त्यातून अनेकांना दिलासा मिळाला. त्यामुळेच आजही खासदार सुजय विखे पाटील यांचा विळद घाट अनेकांना आशेचा किरण वाटत आहे. जीव वाचले पाहिजेत ही भूमिका घेऊन आपण करीत असून ही वेळ राजकारणाची नसून मदत आणि आधार देण्याची असल्याची भावना खासदार विखे पाटील कार्यकर्त्यांशी बोलताना व्यक्त करतात. खासदार असलेले सुजय विखे पाटील यांचे हे वेगळेपण त्यामुळेच अनेकांना भावलं आहे. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *