Breaking News

1/breakingnews/recent

22 एप्रिल सह्याद्री बुलेटिन

No comments

  News24सह्याद्री महाराष्ट्राला ८० हजार रेमडेसिवीरची गरज असताना गुजरातमध्ये मोफत वाटप सुरु...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES


1. मनसे आमदाराच्या वक्तव्यावर शिवसेनची टीका !
कल्याण - डोंबिवली मध्ये कोरोना  रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे ऑक्सिजन व रेमेडिसिवर इंजेक्शन चा तुडवडा जाणवत आहेत.या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी केडीएमसी आयुक डॉ. विजय सूर्यवंशी यांची भेट घेतली.यावेळी पत्रकारांशी बोलताना सर्व जिल्याचे पालकमंत्री तेथील आयुक्तांशी भेटून चर्चा करत आहेत पण ठाणे जिल्हाचे पालकमंत्री आहेत कुठे असा सवाल मनसे आमदार राजू पाटील यांनी केला होता.

2. अंबड येथे घनकचरा प्रकल्पाला आग
जालन्यातील अंबड येथे असलेल्या घनकचरा प्रकल्पाला आग लागलीय काल सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास ही आग लागली होतीय. तेव्हा सदरची आग विझवण्यात आली होतीय मात्र आग विझली नसल्याने पुन्हा रात्री आठ वाजेच्या सुमारास आग दिसुन आलीय.

3. भारतात गेल्या २४ तासांत तीन लाखांहून अधिक रुग्णांची नोंद
भारतात करोनाचा कहर वाढत असून गेल्या २४ तासांत तीन लाखांहून अधिक करोना रुग्णांची नोंद झाली आहे. देशात पहिल्यांदाच तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे भारतात नोंद झालेली रुग्णसंख्या ही जगातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या आहे.

4. सीताराम येचुरी यांना पुत्रशोक
सीपीएमचे महासचिव सीताराम यचुरी यांचा जेष्ठ पुत्र आशिष यचुरी यांचं करोनामुळे निधन झालंय. गुरुवारी सकाळी गुडगावमधील खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिताराम यचुरी यांनी एक ट्विट करत ही दु:खद बातमी दिली आहे.

5. ‘प्राणवायू’वरून दिल्ली-हरियाणात वाक्युद्ध
दिल्लीतील अनेक रुग्णालये सलग दुसऱ्या दिवशी प्राणवायूच्या टंचाईमुळे रुग्णांचे जीव वाचवण्यासाठी धडपड करत असतानाच, या शहराला होणारा प्राणवायूचा पुरवठा रोखत असल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी बुधवारी हरियाणा सरकारवर केला.

6. काहीही करून रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा करा!
राजधानी दिल्लीतील गंभीर स्वरूपाच्या करोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या आणि प्राणवायूची टंचाई जाणवत असलेल्या रुग्णालयांना काहीही करून तत्काळ प्राणवायूचा पुरवठा करावा, असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र सरकारला दिला.

7. केंद्रावर खापर फोडणं अयोग्य, तुम्ही काय करताय ते सांगा – प्रवीण दरेकर
राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला असून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपण केंद्राच्या पाया पडायला तयार असल्याचं म्हटलं आहे. केंद्राने मदत करण्याची मागणी राजेश टोपे यांनी केली असून पुन्हा एकदा केंद्र आणि राज्य सरकार आमने-सामने आलं आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी एका मुलाखतीत राज्य सरकारला  काही झालं तरी केंद्र सरकार आठवतं असा टोला लगावला आहे.

8. देशात १३ कोटी नागरिकांना लस
देशात कोविड लसीकरणाचा वेग कायम असून १३ कोटी जणांना ९५ दिवसांत लस देण्यात आली, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. अमेरिकेने हे उद्दिष्ट १०१ दिवसात, तर चीनने १०९ दिवसात पूर्ण केले होते. एकूण १३ कोटी १ लाख १९ हजार ३१० मात्रा देण्यात आल्या आहेत. त्यासाठी १९ लाख १ हजार ४१३ सत्रे घेण्यात आली.

9. लस घेतल्यानंतरही अनेकांना करोनाची बाधा
कोव्हिशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन या लशींची पहिली मात्रा घेतल्यानंतर २१ हजारांहून अधिक लोक करोना पॉझिटिव्ह ठरले असून; दुसरी मात्रा घेतल्यानंतर ५५०० हून अधिक लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती केंद्र सरकारने बुधवारी दिली. मात्र एकूण लसीकरणाच्या तुलनेत हे प्रमाण अत्यल्प असल्याचा दावा भारतीय वैद्यक संशोधन परिषदेने (आयसीएमआर) केला आहे.

10. कोव्हॅक्सिन लस ७८ टक्के परिणामकारक
कोविड-१९ च्या सौम्य, मध्यम आणि तीव्र स्वरूपाच्या प्रकरणांमध्ये आपली कोव्हॅक्सिन लस ७८ टक्के परिणामकारक असल्याचे या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील अंतरिम विश्लेषणाच्या निष्कर्षांमध्ये आढळले आहे, असे या लशीचे उत्पादन करणाऱ्या भारत बायोटेकने बुधवारी सांगितले.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *