Breaking News

1/breakingnews/recent

विराट कोहलीने टीममधून काढलेले खेळाडू आत RCB चा बदला घेणार

No commentsमुंबई -

सध्या (IPL 2021) खूप जोरात रंगत आहे. इंडियन प्रीमियर लीगच्या 14 सिझनमधील (IPL 2021) 16 वी मॅच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध राजस्थान रॉयल्स  यांच्यात होणार आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणारी ही मॅच जिंकून विजयी चौकार लगावण्याचा आरसीबीचा कॅप्टन विराट कोहलीचा  प्रयत्न असेल. तर राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन संजू सॅमसन  मागील पराभव विसरुन पुन्हा एकदा लय पकडण्यासाठी ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करेल. आयपीएलमधील दोन रॉयल्स टीममधील या लढतीत सर्वांचं लक्ष विराट कोहलीच्या दोन माजी सहकाऱ्यांवर असेल. ख्रिस मॉरीस आणि शिवम दुबे  हे राजस्थान रॉयल्सचे दोन ऑल राऊंडर्स मागील सिझनमध्ये (IPL 2019) आरसीबीचे सदस्य होते. त्यांना या आयपीएल लिलावापूर्वी आरसीबीनं मुक्त केले. त्यानंतर आता ते राजस्थानच्या टीमचे सदस्य आहेत.

शिवम या सिझनमध्ये फार कमाल करु शकलेला नाही. त्यानं 3 मॅचमध्ये 14 च्या सरासरीनं 100 च्या स्ट्राईक रेटनं फक्त 42 रन केले आहेत. आरसीबी विरुद्ध ही कामगिरी सुधारण्याचा शिवमचा प्रयत्न असेल. शिवमसाठी वानखेडे स्टेडियम हे घरंच मैदान आहे. तसंच तो या सिझनमध्ये तीन मॅच वानखेडेवर खेळला आहे. विराटची टीम वानखेडेवर पहिलीच मॅच खेळणार आहे. शिवम प्रमाणेच ख्रिस मॉरीसही आरसीबी विरुद्ध सर्वोत्तम कामगिरीसाठी सज्ज आहे. मॉरीसनं दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध निर्णायक क्षणी आक्रमक फटकेबाजी करत राजस्थानला विजय मिळवून दिला होता. राजस्थानला 2 ओव्हरमध्ये 27 रन हवे होते. त्यावेळी मॉरीसनं कागिसो रबाडाच्या एकाच ओव्हरमध्ये 15 रन काढले. त्यानंतर त्यानं शेवटच्या ओव्हरमध्ये आवश्यक असलेले 12 रन फक्त 4 बॉलमध्ये पूर्ण केले. आयपीएल लिलावात ख्रिस मॉरीस सर्वात महाग ठरला होता. दिल्ली कॅपिटल्स विरुद्धच्या लढतीमध्ये आपल्यात 'पैसा वसूल' खेळ करण्याची क्षमता असल्याचं मॉरीसनं दाखवलं आहे. आता जुन्या टीमविरुद्धही त्यानं पुन्हा एकदा धमाका केल्यास विराट कोहलीची डोकेदुखी वाढू शकते.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *