Breaking News

1/breakingnews/recent

शहराची खबरबात - रोटरी इंटिग्रिटीचा बुथ हॉस्पिटलला महिनाभर ऑक्सिजनचा आधार

No comments

 News24सह्याद्री - रोटरी इंटिग्रिटीचा बुथ हॉस्पिटलला महिनाभर ऑक्सिजनचा आधार..पहा शहराची खबरबात मध्ये




TOP HEADLINES


1. उशिराच पण  प्रशासनाला जाग आली
ऑक्सीजन मिळवण्यासाठी रीफिलर कडे लागणाऱ्या रांगा, त्यावरून होणारी मारामारी ठराविक लोकांनाच मिळणारे झुकते माप आदी बाबत सातत्याने तक्रारी आल्यानंतर उशिरा का होईना जिल्हा प्रशासनाला जाग आली असून जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी ऑक्सिजनचा पर्याप्त वापर सुयोग्य पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी सहा पथकांची नियुक्ती केली आहे.

२. रोटरी इंटिग्रिटी चा बुथ हॉस्पिटल ला महिनाभर ऑक्सिजनचा आधार
ऑक्सिजन अभावी कोणत्याही रुग्णाचे प्राण जाऊ नये यासाठी मदतीचा हात पुढे करून रोटरी क्लब ऑफ अहमदनगर इंटिग्रिटी च्या वतीने बुथ हॉस्पिटल ला ऑक्सिजनचे पाच जम्बो सिलेंडर देण्यात आले तर पुढील एक महिन्यासाठी सदर टाकीच्या ऑक्सिजनच्या खर्चाची जबाबदारी रोटरी इंटिग्रिटी ने उचलली आहे

३. महसूल कर्मचाऱ्यांचा थकीत पगार खात्यात जमा
करुणा संक्रमणाच्या काळात आपले कर्तव्य अथकपणे बजावणाऱ्या महसूल कर्मचाऱ्यांच्या थकलेल्या वेतनाचा प्रश्न सुटला आहे काल दुपारनंतर फिट खात्यात पगार जमा झाल्याचे संदेश कर्मचाऱ्यांना प्राप्त झाले यासंदर्भात जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी विचारणा करत जिल्हा कोषागार विभागात सोमवारी निर्देश दिले होते त्याचा परिणाम म्हणून जिल्हा कोषागार कार्यालयाने मंगळवारी तात्काळ कार्यवाही केली

४. श्रमिक बालाजी मंदिर तर्फे गरजूंना किराणा वाटप
नगर- येथील सावेडीमध्ये श्री श्रमिक बालाजी मंदिराच्या तर्फे सध्या चालू असलेल्या लोकडाडाऊन मध्ये अत्यंत गरज आहे अशा९०  कुटुंबांना किराणा सामान वाटप करण्यात आले . यामध्ये पाच किलो तांदूळ, एक किलो तुरीची डाळ एक किलो तेल व एक टरबूज प्रत्येकी देण्यात आले. 

५. भगवान फुलसौदर यांचे मनपा आयुक्तांना निवेदन
मनपाच्या आरोग्यविभागाच्या वतीने शहरातील विविध आरोग्य केंद्रावर मोफत लस देण्यात येत आहे .त्या ठिकाणी नागरिकांची मोठी गर्दी होत असून त्या  ठिकाणी मोठा गोंधळ उडत असल्याचे पहावयास मिळत आहे . कोणत्या दिवशी कोणती लस द्यावयाची कॅव्हॅक्सिन - कोविशील्ड याबाबत कोठेही सूचना फलक नाहीत .अनेक जेष्ठ नागरिक लस घेण्यासाठी  सकाळ पासून त्या आरोग्य केंद्रावर रांगा लावत आहेत .त्याचा नंबर जवळ आल्यावर त्यांना सांगण्यात येते कि आज लस शिल्लक नाही.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *