Breaking News

1/breakingnews/recent

3 मार्च सह्याद्री वेगवान आढावा

No comments

       News24सह्याद्री - तिन दुकानास आग लागुन लाखो रूपयाचे नुकसान...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. अर्णब गोस्वामींना विधीमंडळ समितीचे समन्स 
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना विधीमंडळाच्या हक्कभंग समितीसमोरहजर राहण्यासाठी पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आला आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांचा अवमानकारक उल्लेख केल्याप्रकरणी गोस्वामी यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंग मांडण्यात आला आहे. 

2. तिन दुकानास आग लागुन लाखो रूपयाचे नुकसान
लोणार शहरातील मुख्य रस्त्यावरील तिन दुकानास आग लागुन लाखो रूपयाचे नुकसान झाल्याची घटना घडलीये 
 यामध्ये कपडा दुकान, स्टेशनरी, व किराणा दुकानाचा समावेश आहे

3. बनावटी दस्तावेजचा वापर करुण मिळवले धाडचे सरपंच पद,
तालुक्यातील धाड येथे नुकतेच ग्रामपंचायत मध्ये सरपंच पदाची निवडणूक पार पडली आहे. या निवडणूकीत सरपंचाने बोगस व बनावटी दस्तावेजचा वापर केला आहे.

4. रस्त्यांची दुर्दशा दूर होऊन दोन दिवसाआड पाणी पुरवू 
चोपडा  शहरासाठी नवीन पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे या पाणी पुरवठा योजनेचे काम जवळपास ६१% पूर्ण झाले आहे फक्त ३९% काम अपूर्ण राहिले आहे. तेही काम लवकरच पूर्ण होईल. पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाले की, शहरात दोन दिवसाआड पाणी सर्वत्र उपलब्ध होईल. 

5. १२० किमी लांबीच्या रेल्वे मार्गाची पाहणी 
 प्रस्तावित असलेल्या औरंगाबाद,साजापुर, अंबेलोहळ, येसगाव, गंंगापूर, देवगड,नेवासा, शनिशिंगणापूर, या १२० किमी लांबीच्या रेल्वे मार्गाच्या प्रत्यक्ष सर्वेक्षणासाठी रेल्वे मार्ग सर्वेक्षण समितीने या मार्गावर भेट देऊन पाहणी केली आहे. 

6. टिळक नगर पोलिसांनी चोरांना केले ४८ तासात गजाआड
डोंबिवलीत भोईरवाडी शिवमंदिर जवळ राहणारे सागर भोईर हे गेल्या कित्येक वर्षांपासून मेंढ्या पालनाचा व्यवसाय करत आहेत.

7. आमदार भारसाकळे यांना मागितली ५ कोटींची खंडणी..
 अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या दर्यापूर येथील निवासस्थानी आठ दिवसांपुर्वी एक धमकीचे पत्र आलेय. या पत्रामध्ये भारसाकळे यांना तब्बल पाच कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली आहे. 

8. बुट काढण्यावरुन परस्पर तक्रारी दाखल
 चोपडा येथील ग्रामपंचायतीच्या मासिक मिंटीगला ग्रामपंचायत सदस्य लतीफ सुपडू तडवी बुट घालुन मध्ये आल्याने वादाला तोंड फुटले असुन याप्रकरणी परस्पर विरुध्द गुन्हे दाखल झाले आहेत. 

9. अवैध ज्वलनशील पदार्थांचा साठा करणाऱ्यांविरोधात महापौर अ‍ॅक्शन मोडमध्ये
मुंबईमध्ये वारंवार आगीच्या घटना घडतात. त्यात अनेकवेळाअवैध गॅस सिलेंडरच्या साठ्यामुळे आगी लागण्याच्या घटना समोर आल्या आहेत. 

10. मालमत्ता कराची 20 हजार कोटींची थकबाकी
मुंबई महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी मालमत्ता कराच्या जास्तीत जास्त वसुलीवर भर दिला जात आहे. मुंबईत मालमत्ता कराची 20 हजार कोटींची थकबाकी आहे. 
  

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *