Breaking News

1/breakingnews/recent

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच एक मार्ग आहे; सुधीर मुनगंटीवार यांचा इशारा

No comments



मुंबई -

जळगावमध्ये जी घटना घडली त्या वर मुनगंटीवार यांनी इशारा दिला आहे. ते म्हणाले की जळगाव येथील वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास लावण्यात आल्याच्या प्रकरणाचे आज विधानसभेत पडसाद उमटले आहेत. आमच्या आयाबहिणींची थट्टा केली जात असेल तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करणे हाच एक मार्ग आहे.असे ते म्हणाले या सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे, असा इशारा भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिला आहे. मुनगंटीवार यांच्या या मागणीला अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हरकत घेऊन त्यांचे वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली आहे. त्यावर संबंधित वाक्य तपासून कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे. जळगाव येथील एका वसतिगृहात काही तरुणींना विवस्त्र होऊन नृत्य करण्याची सक्ती करण्यात येत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

आज विधानसभेत त्यावरून पडसाद उमटले. आमदार श्वेता महाले यांनी जळगावच्या आशादीप वसतिगृहाचा हा विषय काढला आहे. पोलीस महिलांचे रक्षक आहेत. पण तेच महिलांवर अन्याय करत आहेत. महिलांना नग्न करून नाचवले जात आहे हे गंभीर आहे, असं महाले म्हणाल्या. त्यावर भाजप नेते सुधीर मुनंगटीवार यांनी या प्रकरणावरून प्रचंड संताप व्यक्त करत थेट राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आल्याचे सांगितले आहे. मी संविधानाला मानणारा आहे. संविधानाचे पालन करणारा आहे. पण राज्यात आमच्या आयाबहिणींची होत असलेली थट्टा पाहता राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय पर्याय नाही. आमच्या आयाबहिणीला नग्न केले जाते हे महाराष्ट्राला शोभते काय? असा सवाल करतानाच सरकारवर राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली आहे. तशी मलाच मागणी करावी लागेल, असे ते म्हणाले आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *