Breaking News

1/breakingnews/recent

अनुराग कश्यप, यांच्याविरोधात आयकर विभागाने आज धाडसत्र सुरू; मालमत्तांची झाडाझडती

No comments



मुंबई -

सोशल मीडियातून भूमिका मांडणाऱ्या व सातत्याने चर्चेत असणाऱ्या प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नू यांच्याविरोधात आयकर विभागाने आज धाडसत्र सुरू केली आहे. आयकर विभागाच्या पथकांनी अनुराग कश्यप आणि तापसीच्या मुंबईतील मालमत्तावर छापे टाकत झाडाझडती सुरू केली आहे. अनुराग आणि तापसी बरोबरच विकास बहल आणि मधु मंटेना यांच्या घरीही आयकरने छापे टाकल्याचे वृत्त आहे.

आयकर विभागाने बुधवारी दुपारी अनुराग कश्यप आणि तापसी पन्नूच्या मालमत्तांवर छापे मारले. ‘फँटम फिल्म’शी संबंधित लोकांच्या घरांवर या धाडी टाकण्यात आल्या आहे. त्याचबरोबर मधू मंटेना यांची कंपनी ‘क्वान’ यांच्या कार्यालयावरही छापे मारण्यात आले आहे. कर चुकवल्याच्या आरोपाखाली हे छापे टाकण्यात आले असून, मुंबईतील तब्बल २२ ठिकाणांची झाडाझडती आयकर विभागाकडून घेतली जात आहे. यात फँटम प्रोडक्शन हाऊसशी संबंधित अनुराग कश्यप, तापसी पन्नू, विकास बहल आणि मधू मंटेना यांच्या मालमत्तावर आयकरने धाडी टाकल्या आहेत.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *