2 मार्च सह्याद्री वेगवान आढावा

News24सह्याद्री - कत्तलीसाठी नेणाऱ्या तब्बल 141 गायी, म्हशी ताब्यात...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. अण्वस्त्रांची चाचणी घेण्याची क्षमता विकसीत करण्याचे चीनचे प्रयत्न
अत्याधुनिक अण्वस्त्रे तयार करून त्यांची भूमिगत केंद्रांवरून चाचणी घेण्याची क्षमता विकसीत करण्यासाठी चीनचे जोरदार प्रयत्न सुरु आहे.
2. मुंबईतील ब्लॅक आऊटबाबत चीनची प्रतिक्रिया
मुंबईतील ब्लॅकआऊटमागील चीनमधील कारस्थान उघडकीस आले आहे. रिपोर्ट्सनुसार चीन अजूनही भारतात ब्लॅकआऊट करण्याचा कट रचत आहे.
3. तेजस या भारतीय फायटर विमानाचं अमेरिकेत कौतुक
बालाकोटमधल्या हल्ल्याला नुकतीच २ वर्षं पूर्ण झाली. या हल्ल्यात मिराज विमान आणि स्पाईस या बॉम्बची उपयुक्तता सिद्ध झालीये.
4. तिरुपती बालाजी देवस्थानाचं 2 हजार 937 कोटींचं बजेट मंजुर
देशातील सर्वात श्रीमंत मंदिर तिरुपती बालाजी देवस्थानाने नुकतंच आपलं बजेट मंजूर केलं आहे. सर्वात श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुपती देवस्थानच्या 2 हजार 937 कोटींच्या बजेटला नुकतीच मंजुरी देण्यात आली.
5. देशभरात लसीकरण सुरू, भाजप खासदाराचे कोरोनामुळे निधन
देशभरात एकीकडे कोरोना लसीकरण सुरू आहे तर दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्यामुळे चिंतेच वातावरण आहे.
6. सुप्रीम कोर्टात लसीकरण, विद्यमान आणि निवृत्त न्यायमूर्तींना देणार लस
सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचं लसीकरण करण्यात येणार असून विद्यमान, निवृत्त न्यायमूर्तींना लस दिली जाणार आहे तसेच त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचंही लसीकरण करण्यात येणार आहे
7. कानपूरमध्ये मोठा अपघात, ट्रक उलटून 22 मजूर अडकले, 6 ठार
उत्तर प्रदेशमधील कानपूर जिल्ह्यात भरधाव ट्रक उलटून भीषण अपघात घडला आहे. या अपघातात 6 जणांचा दुर्दैवी मृ्त्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहे.
8. कत्तलीसाठी नेणाऱ्या तब्बल 141 गायी, म्हशी ताब्यात
गडचिरोली जिल्ह्यात अल्प किंमतीमध्ये शेतकऱ्यांकडून गायी म्हशीसह जनावरे खरेदी करुन तेलंगणाच्या कत्तलखाण्यात कत्तलीसाठी नेणाऱ्या एका टोळीला गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे.
9. दिल्लीतून पृथ्वीराज चव्हाण यांना ताकद
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यांतर पृथ्वीराज चव्हाण यांना कोणतीही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांचे राजकीय वजन कमी झाले की काय अशी चर्चा सुरू असतानाच आता पुन्हा एकदा पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर विश्वास टाकत आसाम निवडणुकीसाठी त्यांना मोठी जबाबदारी दिली आहे.
10. चेंडू समजून उचलला बाँब
बिहार राज्यातील खगरियामधून एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. झाडीमध्ये अडकून बसलेल्या चेंडूसारख्या वस्तूवर मुलांनी काठीने मारायला सुरुवात केली.
No comments
Post a Comment