2 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज

News24सह्याद्री - कोपरगावात अडीच लाखांची घरफोडी....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये
TOP HEADLINES
1. कर्जबाजारीपणाला,नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्त्या
जामखेड तालुक्यातील नान्नज येथील बाळु बाबुराव मोहळकर या शेतकऱ्यांने कर्जबाजारीपणाला ,व नापिकीला कंटाळून स्वतः च्या शेतातील राहत्या घरात विषारी औषध पेऊन केली आत्महत्या.
2. तालुका जेसीबी मालक संघटनेच्या अध्यक्षपदी अजिंक्य फडके
शेवगाव शहर, सर्कल तालुका जेसीबी मालक संघटनेच्या अध्यक्षपदी अजिंक्य फडके, उपाध्यक्षपदी शिवाजी भुसारी सचिव पदी रमेश डमाळ यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
3. काळ्या जादूचा पर्दाफाश
राहुरी फॅक्टरी येथे शनिवारी पौर्णिमेच्या रात्री गुरुकुल वसाहतीमधील एका घरात चाललेल्या अघोरी जादूचा स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे पर्दाफाश झाला.
4. कोपरगावात अडीच लाखांची घरफोडी
अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातील दोन लाख 63 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना कोपरगाव शहरातील रिद्धी सिद्धी नगर मध्ये शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.
5. महादेव देवस्थानच्या विश्वस्तांना 31 लाखोंचा ठोठावला दंड
बेकायदा उत्खनन केल्याप्रकरणी शेवगावच्या महादेव देवस्थान ट्रस्टच्या विश्वास तहसीलदारांनी 31 लाख 12 हजार 500 रुपये दंड ठोठावला होता. या निकालाविरोधात विश्वस्थानी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे अपील करून निर्णयाला स्थगिती मागितली होती.
6. किरकोळ कारणातून भावाभावात मारामारी
किरकोळ वादातून राजुर शिवारात दोन भावांमध्ये मारामारी झाली त्यात दोघेही जखमी झाले याबाबत परस्पर विरोधी तक्रारीवरून पोलिसांनी दोघांवर ही कारवाई केली आहे.
7. महावितरण हा समोर ठिय्या
कोपरगाव जेजुर कुंभारी परिसरात विजेचा लपंडाव सुरू आहे त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयासमोर आज ठिय्या आंदोलन करीत अधिकाऱ्यांना जाब विचारला पूर्व क्षमतेने नियमित वीज पुरवठा करण्याची मागणी करीत त्यांना धारेवर धरलं सहाय्यक अभियंता यज्ञेश शेलार यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
8. गुन्हेगारासह चोरीचे सोने विकत घेणार्या सोनाराला अटक
घरफोड्या करणार्या एक सराईत गुन्हेगाराकडून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यासह चोरट्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली.भगवान ईश्वर भोसले असे चोरट्याचे नाव असून रामा अभिमन्यू इंगळे असे अटक करण्यात आलेल्या सोनाराची नाव आहे.
9. कोरोना प्रादुर्भाव. या ठिकाणची महाशिवरात्री यात्रोत्सव रद्द
देशासह राज्यात कोरोनामुळे अनेक सण उत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आले आहे. तसेच काही उत्सव हे रद्द देखील करण्यात आले आहे.
10. विद्यार्थी आढळला कोरोनाबाधित
शाळेतील विद्यार्थिनी करोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने शाळा आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान हा धक्कादायक प्रकार श्रीरामपूर तालक्यातील मालुंजा येथील एका शाळेत घडला आहे.
No comments
Post a Comment