Breaking News

1/breakingnews/recent

केंद्राने पेट्रोल-डिझेलवरील एक्साईजऐवजी सेस कमी करावा - रोहित पवार

No comments



मुंबई -

दिवसेंदिवस सध्या पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांचा मुद्दा सध्या देशभरात गाजत आहे. देशातील अनेक भागात पेट्रोलचे दर प्रति लिटर शंभर रूपयांपेक्षा पुढे गेले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करावे, अशी मागणी केली जात आहे. ही चर्चा सुरू असतानाच केंद्रीय अर्थमंत्रालय पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी पावले उचलणार असल्याचे समोर आले आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी पंतप्रधान आणि निर्मला सीतारामन यांच्याकडे महत्त्वाची मागणी केली आहे.

रोहित पवार यांनी वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या दरांबद्दल ट्विट केले आहे. पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आटोक्यात आणण्यासाठी त्यावरील एक्साईज ड्युटी (उत्पादन शुल्क) कमी करण्याचा केंद्राचा विचार स्वागतार्ह आहे. मात्र एक्साईजमध्ये राज्यांना वाटा मिळतो, सेसमध्ये मिळत नाही म्हणून एक्साईजऐवजी सेस कमी करावा. केंद्र सरकार याचा गांभीर्याने विचार करेल, ही अपेक्षा! असे रोहित पवार यांनी पंतप्रधान आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना म्हटले आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *