१ मार्च सह्याद्री वेगवान आढावा
News24सह्याद्री - इस्रोने पुन्हा रचला इतिहास, अंतराळात पाठवले १९ उपग्रह...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा
TOP HEADLINES
1. इस्रोने पुन्हा रचला इतिहास, अंतराळात पाठवले 19 उपग्रह
इस्रोने पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. रविवारी हिंदुस्थानच्या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानच्या माध्यमातून 19 उपग्रह अंतराळात पाठवण्यात आले. नवीन वर्षांतील हे पहिले ऐतिहासिक मिशन इस्रोने फत्ते केले.
2. नरेंद्र मोदी यांनी घेतली कोरोनावरची लस
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोरोना लस घेतली. दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये पंतप्रधान मोदी यांनी ही लस घेतली. पंतप्रधानांनी भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस घेतली.
3. बिटकॉइनची किंमत गडगडली
गेल्या काही काळापासून बिटकॉइनचे भाव गगनाला भिडत होते. काही दिवसांपूर्वी 8 फेब्रुवारीला एका बिटकाइनची किंमत तब्बल 60 हजार डॉलर्स इतकी झाली होती. तेव्हापासून वरच्या दिशेने जाणाऱ्या या आभासी आभासी चलनाला रविवारी खिळ बसली आहे.
4. उन्नावनंतर आता अलिगढमध्ये जंगलात अल्पवयीन मुलीचा मृतदेह
अलिगढच्या एका गावात जनावरांसाठी चारा घेण्यासाठी गेलेल्या एका मुलीचा मृतदेह जंगलात मिळाल्याने एकच खळबळ माजली. ही घटना अकराबाद ठाण्याअंतर्गत एका गावात घडली आहे.
5. राम मंदिर बांधकामासाठी रु. २१०० कोटीची देणगी
उत्तर प्रदेशातील अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर बांधकामासाठी २१०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीची देणगी मिळाली आहे. ही रक्कम मंदिर बांधकामाला लागणाऱ्या अंदाजे खर्चापेक्षा दीडपट जास्त आहे.
6. नांदेड येथे शासकीय नर्सिंग कॉलेजला राज्य शासनाची मंजुरी
नांदेड : जिल्ह्यात शासकीय नर्सिंग कॉलेजला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली.
7. नाराज काँग्रेस नेत्यांचं राहुल गांधींना आव्हान
पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांपूर्वी काँग्रेसमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळून आला आहे. राज्यसभेतून निवृत्त झालेले वरिष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद हे या बंडाच्या केंद्रस्थानी आहेत. आझाद यांचा बालेकिल्ला असलेल्या जम्मूमध्ये काँग्रेसमधील नाराज 23 नेत्यांनी शनिवारी शक्तीप्रदर्शन केलं.
8. एप्रिलपर्यंत कमी होतील पेट्रोल, डिझेलचे दर
एप्रिल २०२१ पर्यंत पेट्रोल , डिझेलसह सर्व प्रकारच्या इंधनाचे दर कमी होतील, असा विश्वास भारताचे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला.
9. महिलांसाठी सरकारची मोठी योजना
सरकारने महिला सशक्तिकरण राष्ट्रीय धोरण 20 मार्च 2001 रोजीपासून राबवण्यास सुरुवात केली आहे. ज्याचं उद्दीष्ट महिलांच्या प्रगती, विकास आहे. या धोरणाचं मूळ उद्दीष्ट म्हणजे स्त्रियांसह सर्व प्रकारच्या भेदभावाचा अंत करणं. महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने देशभरात अनेक योजना चालवल्या आहेत.
10. पाकिस्तानचा दिग्गज गोलंदाज मोहम्मद आमिरची धुलाई
भारतात लवकरच आयपीएलचा हंगाम सुरु होणार आहे. आयपीएलप्रमाणेच पाकिस्तानमध्येसुद्धा सध्या पाकिस्तान सुपर लीग म्हणजेच पीएसएल सामन्यांची चर्चा आहे. पीएसएल लीगमध्ये 28 फेब्रुवारी रोजी लाहोर कलंदर्स आणि कराची किंग्स या दोन संघांमध्ये झालेला सामना चांगलाच रोमहर्षक ठरला.
No comments
Post a Comment