Breaking News

1/breakingnews/recent

1 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

    News24सह्याद्री - जिल्ह्यात खासगी रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था....पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये 




TOP HEADLINES

1. जिल्ह्यात खासगी रुग्णालयात लसीकरणाची व्यवस्था
केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार खाजगी रुग्णालये  कोरोना लसीकरण केंद्र म्हणून काम करणार आहेत इथे कोरोना लसीकरणासाठी प्रत्येक व्यक्तीला दोनशे पन्नास रुपये खर्च येणार आहे यातील rs.150 रुपय  रुग्णालयांना शासनाकडे भरावी लागणार आहे.

2. शेवगावचे सुपुत्र श्रीकांत सुसे झाले लेहचे जिल्हाधिकारी  
आय ए एस श्रीकांत सुसे यांनी नुकताच लडाख  केंद्रशासित प्रदेशातील जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे 

3. गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ
पेट्रोल- डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात   पुन्हा एकदा 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. . त्यामुळे  अहमदनगर शहरातील ग्राहकांना 14.2 किलो वजनाच्या विना अनुदानित सिलेंडरसाठी ८ ३२ ते ५० रुपये मोजावे लागणार आहे.

4. शेतकऱ्यावर रानगव्या प्राण्याचा  हाल्ला
जामखेड तालुक्यातील वंजारवाडी येथील शेतकऱ्यावर रानगव्या प्राण्याने  हाल्ला केला या  हाल्ल्यात  संतोष भिमराव दराडे हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे 

5. घराचे कुलूप तोडून २लाख६३हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास
कोपरगाव  शहरातील रिद्धीसिद्धी नगर येथे अज्ञात चोरट्यांनी. घराचे कुलूप तोडून २लाख६३हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली आहे.

6. शेतकऱ्यांना मिळाली नुकसानभरपाई
मागील वर्षी अवकाळी पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले होते. महाराष्ट्र शासनाने नुकसान भरपाई जाहीर केली. नुकसानीचे पंचनामे झाल्यानंतर काही गावातील शेतकऱ्यांना मिळाले होते तर काहींना मिळाले नव्हते. पाथर्डी तालुक्यातील अनेक गावामधील शेतकरी या भरपाईपासून वंचित होते. 

7. लस घेतलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यासह पाच कर्मचाऱ्यांना कोरोना
श्रीगोंदा : तालुक्यातील बेलवंडी पोलीस ठाण्यातील कोरोना लस घेतलेल्या एका अधिकाऱ्यासह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

8. काळ्या जादूचा पर्दाफाश
राहुरी फॅक्टरी येथे काल दांडी पौर्णिमेच्या रात्री वसाहतीतील एका घरात चाललेल्या अघोरी काळ्याजादूच्या पर्दाफाश स्थानिक रहिवाशांच्या सतर्कतेमुळे झालाय जादूटोण्यासाठी घरात मांडलेली पूजा पोलिसांनी उध्वस्त केली 

9. सात दिवसात दोन दुचाकींची चोरी
संगमनेर तालुक्याच्या पठार भागात दुचाकी चोरीचे सत्र सुरूच आहे त्यामुळे वाहनधारकांच्या चिंतेत वाढ झाली आहे पोलिस प्रशासनाच्या नाकावर टिच्चून चोऱ्या सुरूच आहे.

10. डिंभे - माणिकडोह बोगद्यासाठी मास्टर प्लॅन  
कुकडी प्रकल्पातील डिंभे माणिकडोह जोड बोगदा प्रकल्पाबाबत कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ व त्यांच्या टीमशी लवकरच चर्चा करणार आहे त्यानंतर हा प्रश्न सोडविण्यासाठी मास्टर प्लॅन करणार आहे अशी माहिती खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी दिली आहे.

 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *