Breaking News

1/breakingnews/recent

‘ए काय रे,सभागृहात कसं वागायचं हे शिकवा यांना, अन् सभागृहातच फडणवीस संतापले

No comments



मुंबई -

महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झालेले पहायला मिळले आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षाकडे दुर्लक्ष होत असल्याची टीका करत सभागृहातून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे यावेळी गदारोळ घालणाऱ्या सदस्याकडे पाहून ‘ए काय रे…’असे म्हणत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखालीच विधीमंडळाचे कामकाज चालवले जात आहे. आम्हाला संधी देतो असं तुम्ही सांगू शकता. पण तुम्ही पाहतच नाही. सुधीर मुनगंटीवार ज्येष्ठ सदस्य आहे. 

ते मगापासून बोलण्यासाठी उभे आहे पण तुम्ही त्यांच्याकडे पाहतच नाही. आमच्या अधिकाराचे हनन होत असेल आणि असं रेटून घ्यायचं असेल तर कशाला बसवता. पाठवा ना बाहेर असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. यावेळी सत्ताधारी पक्षातील आमदारांना गदारोळ सुरु केला असता फडणवीसांनी त्यांच्याकडे पाहून ए काय रे असा उल्लेख करताच अजून गदारोळ सुरु झाला. पुढे बोलताना ते म्हणाले की, सभागृहात कसे वागायचे हे शिकवा यांना आपण विरोधी पक्षाकडे लक्ष दिले पाहिजे. आम्ही उभे आहोत, आमचा हक्क आहे. आमच्या अधिकारांचं हनन होणार असेल तर आम्ही एक मिनिटं बसणार नाही.

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *