10 मार्च सह्याद्री सुपरफास्ट

News24सह्याद्री - नागपुरात भाजपला खिंडार, ३१ नेते-पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश...पहा देशातील,राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा सुपरफास्ट आढावा
बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर ग्रामीण पोलिसांनी ७ क्विंटल गांजा व २ महागडी वाहने असा १ कोटी १० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत एका आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश आले. तिघे जण मात्र फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत
नागपूर जिल्ह्यातील वाडीमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे. वाडीचे नगराध्यक्ष प्रेम झाडे यांच्यासह भाजपच्या 31 पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला.
राष्ट्रवादीचे नेते भारत भालके याच्या मृत्यूनंतर रिक्त असलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची चिन्हं आहेत. पोटनिवडणुची अधिकृत घोषणा झाली नसली तरी, त्यासाठी भाजपने तयारी सुरु केली आहे.
एका अठरा महिन्याच्या मुलाच्या पोटात गर्भ आढळल्याची खळबळजनक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र येथील डॉक्टरांनी या मुलाच्या पोटातून अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे अर्धा किलो वजनाचे अविकसित मृत गर्भ काढून मुलाचे प्राण वाचविले.
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विविध मुद्द्यांवरून राज्यातील महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरण्यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. हिरेन मनसुख मृत्यू प्रकरणावरून सभागृहातील राजकीय वातावरण तापले. मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावरील कारवाईच्या मागणीवरुन विरोधक आक्रमक भूमिका घेत सभागृहात प्रचंड गदारोळ घातला.
पश्चिम बंगालमध्ये राजकीय वातावरण तापलं आहे. राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी "भाजपाने हिंदुत्ववादाचा खेळ माझ्याबरोबर खेळू नये. मी दररोज घरातून बाहेर पडण्यापूर्वी चंडीपाठाचे उच्चारण करते" असं म्हटलं आहे.
10. कोल्हापूर - महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीतर्फे अंदाजपत्रक सादर
महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी 3 कोटी 56 लाख 74 हजार 720 रुपयांचे शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले. यामध्ये 35 कोटी 52 लाख 28 हजार 650 रूपये जमा तर 31 कोटी 95 लाख 53 हजार 930 रुपयांच्या खर्चाची अपेक्षित तरतूद करण्यात आली आहे.
No comments
Post a Comment