जिल्ह्याची खबरबात - जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केला पारनेर दौरा

News24सह्याद्री - जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केला पारनेर दौरा...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. कोपरगाव शहरात विवेकभैय्या कोल्हे चषक स्पर्धेचे उद्घाटन
कोपरगाव औद्योगिक वसाहतचे चेअरमन व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सह बँकेचे संचालक,युवानेते विवेक कोल्हे यांच्या उपस्थितीत टिळक चौक क्रिकेट क्लब आयोजित व चषक स्पर्धेचे उद्घाटन संपन्न झाले.
2. विद्यार्थ्यांना मास्क व सेनिटायझर वाटप
शेवगाव तालुक्यातील एरंडगाव येथे एकनाथ माध्यमिक विद्यालय मध्ये कोटक महिंद्रा बँक अहमदनगर यांच्या कडून मास्क व सेनिटायझर वाटपाचा करण्यात आले.
3. जामखेड तालुक्यात भरदिवसा घरफोडी
जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे दिवसा घरफोडी ची
घटना
घडली, या घटनेत अज्ञात चोरांनी तीन लाख रुपयांचा ऐवज केला लंपास मात्र काही तासाच्या आतच जामखेड पोलिसांनी संशयित चोरांला अरणगाव शिवारात पाठलाग करून घेतले ताब्यात सुमारे साडे सात तोळे सोन्याचे दागिने आणि साठ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण तीन लाखचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला होता.
4. कोपरगाव शहरातील विस्थापितांना न्याय देण्याची मागणी
कोपरगाव शहरातील अतिक्रमण निघाले होते त्याला आज 10 वर्ष पूर्ण झाले आहे, मात्र आज ही विस्थापितांना न्याय मिळालेला नाही,म्हणून आज कोपरगाव व्यापारी समिती व विस्थापित टपरी धारकांनी उजव्या हताच्या दंडाला काळ्या रंगाच्या फीती बांधून ,काळा दिवसपाळून गांधीगीरी मार्गाने आंदोलन करण्यात आले
5. विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह
शिर्डी शहरातील इनामवाडी येथे लोढा यांच्या विहिरीत तरुणाचा मृतदेह आढळून आला. शिर्डी शहरातील इनाम वाडीतील पेरूच्या बागे जवळील विहिरीत दत्तनगर येथील तरुण सुजित पाडाळ या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.
6. सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह, पतीकडून पत्नीचा निर्घृण खून
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे पती पत्नीच्या भांडणात महिलेचा खून झाला आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
7. निधी अभावी रखडलेल्या कालव्यांच्या कामास आता गती मिळेल - आ.विखे पाटील
उत्तर नगर जिल्ह्याच्या जिरायती भागाला वरदान ठरणा-या निळवंडे धरण कालव्यांच्या कामांसाठी अर्थसंकल्पात ३६५ कोटी रुपयांचा निधी मंजुर झाल्याने निधी अभावी रखडलेल्या कालव्यांच्या कामास आता गती मिळेल असा विश्वास भाजपाचे जेष्ठनेते आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला.
8. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी केला पारनेर दौरा
महसूल विभागाच्या वतीने सप्तपदी अभियानाअंतर्गत अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली व रखडलेल्या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे त्यामुळे या सप्तपदी मुळे चाळीस वर्षांचा रखडलेला रस्ता खुला झाला असल्याची भावना जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांच्या पुढे व्यक्त केल्या.
9. लग्न समारंभांवर श्रीगोंदा पोलिसांची आता करडी नजर
राज्यात करून आणि पुन्हा डोके वर काढले आहे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे शासनाने नियमावली जाहीर केली परंतु लोक सगळे नियम धाब्यावर बसवताना दिसतात विनाकारण रस्त्यावर करणाऱ्यांची गर्दी आवरताना प्रशासनाच्या नाकीनऊ येत आहे.
10. निवडणूकीत खर्च झालेल्या लाखो रुपयांची वसुली वाढीव करातुन
निवडणूकीत खर्च झालेले लाखो रुपये शिर्डी नगरपंचायत वाढीव करातुन वसूल करत आहे तसेच तोल आकारणी करून साईभक्तांवरही अतिरिक्त भार टाकत याचा याचा निषेध करत
No comments
Post a Comment