गॉसिप कल्ला - इंडियन आयडल च्या सेटवर घडलं असं काही

News24सह्याद्री - इंडियन आयडल च्या सेटवर घडलं असं काही... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट १५ मार्च म्हणजेच आज २८वा वाढदिवस साजरा करते आहे. या निमित्ताने तिने तिच्या चाहत्यांना खूप मोठे सरप्राइज दिले आहे. आलिया भटने चित्रपट 'आरआरआर'मधील फर्स्ट लूक शेअर केला आहे. या चित्रपटात आलिया सीताच्या भूमिकेत दिसणार आहे.
2. सचिन खेडेकर घेऊन येणार मराठी कोण बनेगा करोडपती
अनेकांचं करोडपती होण्याचं स्वप्न पूर्ण करणारा छोट्या पडद्यावरील एक शो म्हणजे कौन बनेगा करोडपती अर्थात केबीसी. या शोची रसिकांमध्ये क्रेझ पाहता मराठीतही हा शो सुरू करण्यात आला. मराठीेचे पहिले पर्व हे सचिन खेडकेर यांनी सूत्रसंचालन केले होते.
3. वडिलांना आवाज आवडायचा नाही, रिक्षाही चालवली; आनंद शिंदेंचे किस्से
लोकप्रिय गायक आनंद शिंदे यांच्या आवाजाने मराठी मनावर गारूड निर्माण केलं आहे. त्यांच्या आवाजावर अख्खा महाराष्ट्र ठेका धरत असतो.
4. इंडियन आयडल च्या सेटवर घडलं असं काही
छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो पैकी एक म्हणजे ‘इंडियन आयडल.’ सध्या इंडियन आयडलचे १२वे पर्व सुरु आहे. या शोमध्ये सहभागी होणारा प्रत्येक स्पर्धत हा कायचम चर्चेत असतो. पण सवाई भट्ट शो मध्ये सहभागी झाल्यापासून विशेष चर्चेत आहे. नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये सवाई भट्ट परफॉर्म करत असताना परिक्षकांनी त्याला मध्येच थांबवले आहे.
5. बॉलीवूड अभिनेत्री उर्मीला मातोंडकरची होणार बॉलीवूड मध्ये पुन्हा एंट्री
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर तब्बल 12 वर्षांनी पुन्हा बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहेत. आगामी चित्रपटातून लवकरच उर्मिला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. 2019 साली त्यांनी राजकारणात देखील प्रवेश केला होता.
No comments
Post a Comment