शहराची खबरबात - बाळासाहेब देशपांडे रुग्णालय आरोग्य सुविधांसाठी उत्तम - आ. जगताप

News24सह्याद्री - बाळासाहेब देशपांडे रुग्णालय आरोग्य सुविधांसाठी उत्तम - आ. जगताप... पहा शहराची खबरबात मध्ये
TOP HEADLINES
1. खाजगीकरणाविरोधात बँक कर्मचाऱ्यांचा संप
सरकारच्या बँकांच्या खाजगीकरणाच्या निर्णयाविरोधात बँकांचे कर्मचारी आणि अधिकारी अगदी रस्त्यावर उतरले आहेत. दोन दिवस संप सुरु असताना बँक कर्मचारी आणि अधिकारी यांच्या संघटनांच्या संयुक्त युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन ला आव्हान केले होतं.
2. नगर शहरात आणखी ३ ठिकाणी मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर (मनपा)
नगर शहरात आणखी ३ ठिकाणी मायक्रो कंन्टेन्मेंट झोन जाहीर झाले असून बालिकाश्रम रस्ता, सिव्हील हडको, कोहिनूर मंगल कार्यालय परिसराचा यामध्ये समावेश आहे. २८ मार्चपर्यंत विविध निर्बंध लागूकरण्यात आले आहेत.
3. नगर शहराचे रूप बदलणार
नगर मनपाचे सभापतिपद हा काटेरी मुकुट असून त्याचा मान राखून कार्य केले जाईल, तसेच व्यापारी हमाल वाहतूक संघटना यांच्यात समन्वय साधून मार्केट यार्ड विकासाबरोबरच नगर शहराच रूपच बदलणार असल्याचे मत अविनाश घुले यांनी व्यक्त केलय.
4. २ वर्षांपासून फरार असलेला आरोपी अखेर जेरबंद
दोन खुनाचे आणि दरोड्याच्या गुन्ह्यात मागील दोन वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा दोन खुनाच्या गुन्ह्यांमध्ये फरार होता.
5.बाळासाहेब देशपांडे रुग्णालय आरोग्य सुविधांसाठी उत्तम - आ. जगताप
नगर शहरातील महापालिकेचे बाळासाहेब देशपांडे रुग्णालय हे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये एक महत्त्वाच आरोग्य केंद्र आहे. रुग्णांच्या नातेवाईकांचा या दवाखाण्यावर अतोनात विश्वास आहे. त्याचबरोबर अल्पदरात आरोग्य सुविधा मिळत असल्याने सर्वसामान्य रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लागतो.
No comments
Post a Comment