जिल्ह्याची खबरबात - चोरट्याचा दारू दुकानावर डल्ला

News24सह्याद्री - चोरट्याचा दारू दुकानावर डल्ला....पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. चोरट्याचा दारू दुकानावर डल्ला
सरकार मान्य देशी दारूचे दुकान चोरट्यांनी फोडून ३ लाख ७५ हजार ४१० रूपयांची देशी दारू चोरून नेली.ही घटना शनिवारी रात्री घडली. महामार्गालगत असलेल्या देशी दारूचे दुकानाचे अज्ञात चोरट्याने बंद देशी दारू दुकानाचे शटर तोडून देशी दारूचे प्रत्येकी २१७० रुपये किमतीचे १८० मिली चे १७३ बॉक्स ३ लाख ७५ हजार ४१० रूपये किंमतीचे दारूचे बॉक्स चोरून नेले.
2. प्रदुषण करणाऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी तब्बल ४००० किलोमीटरच्या सायकल प्रवास
आजच्या धावपळीच्या युगात पर्वावरणाचा ऱ्हास व इंधनाचा भरमसाठ वापर करून प्रदुषण करणाऱ्यांचे प्रबोधन करणाण्यासाठी तब्बल ४००० किलोमीटरच्या सायकल प्रवासासाठी निघालेल्या साहसविरांना
गुगळे उद्योग समूहाचे दिलीप गुगळे यांच्या वाढदिवसानिमित्त दोन्ही सायकल स्वारांचे प्रायोजकत्व स्विकारत काल एच. यु. गुगळे उद्योग समुहाच्या वतीने हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले.
3. नगर जिल्ह्यात भाजपला सर्वात मोठा धक्का
अहमदनगर जिल्ह्यात राजकारण कधी कोणत्या दिशेला जाईल कधीच सांगता येत नाही.कारण अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष व भाजपाचे ज्येष्ठ नेते सीताराम पाटील गायकर यांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रवेश निश्चित झाला आहे.
4. तरुणीचा मध्यरात्री अकरा ते दोनच्या दरम्यान खून
राहुरी फॅक्टरी येथे गुंजाळ नाक्याजवळ देशमुख-गिते वस्तीच्या रस्त्यावर नगर-मनमाड महामार्गापासून चाळीस फूट अंतरावर तरुणीचा मृतदेह पडलेला होता.
5. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला इशारा नाही तर
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे गांभीर्य लक्षात घेऊन कठोर अंमलबजावणी करावी लागणार आहे असे स्पष्ट विधान भाजपाचे जेष्ठ नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे.येत्या एक दोन दिवसातच नियमावलीची अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
6. दोन दिवसांपूर्वी सापडलेल्या त्या महिला मृतदेहाचा झाला उलगडा
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव बहिरवाडी शिव रस्त्यावरील नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेश गारूळे यांच्या उसाच्या शेतात अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेत काल सापडलेल्या मृत देह अंदाजे वय 20 वर्ष, तोंडाला ओढणीने झाकलेल्या अवस्थेत 13 मार्च रोजी आढळून आला होता.
7. कोरोना संदर्भात रोहित पवार यांचं ट्विट
लोकडाऊन च्या भीतीने अर्थव्यवस्थेमधील सर्व घटकांमध्ये संभ्रमाची भावना आहे कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन पर्याय नसून लसीकरणा बरोबर लोकांनी कटिबद्ध पने नियमांचे पालन करणे गरजेचे आहे.
8. सचिन वाझे प्रकरणात बाळासाहेब थोरात यांचं वक्त्यव्य
सचिन वाजे प्रकरणात काळजीच्या गोष्टी आहेत मात्र तपास सुरू असल्याने त्याबाबत सध्या बोलणे योग्य नसल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
9. मुळा उजव्या कालव्यातून आवर्तन सोडले, वांबोरी चारी सुरूच राहणार
दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या मुळा धरणातून आज
सकाळी सहा वाजता धरणाच्या उजव्या कालव्यातून उन्हाळी शेतीसाठी पहिले आवर्तन सोडण्यात आले आहे. दरम्यान, वांबोरी चारीचे आवर्तन महिनाभर सुरूच राहणार आहे.
10. मृतदेहाचे सत्र सुरूच आता श्रीरामपूर मध्ये हि आढळला मृतदेह
अहमदनगर जिल्ह्यात दोन दिवसापूर्वी एका महिलेचा मृतदेह उसात सापडला होता ती घटना ताजी असतानाच पुन्हा एकदा जिल्ह्यात एका इसमाचा मृत्यू सापडलेला आहे.
No comments
Post a Comment