गॉसिप कल्ला - स्वप्निल जोशीचा हॉरर लूक

News24सह्याद्री - स्वप्निल जोशीचा हॉरर लूक... पहा गॉसिप कल्ला मध्ये
TOP HEADLINES
1. दीपिका पदुकोणची 'एक्झिट',तर क्रितीची नवी एंट्री
बॉलिवूड स्टार प्रभास आणि सैफ अली खान यांच्या 'आदिपुरुष' या चित्रपटामध्ये आता अभिनेत्री क्रिती सॅनॉनची वर्णी लागली आहे. तसेच, क्रिती सोबत या चित्रपटात सनी सिंग देखील सामील झाला आहे. खुद्द क्रितीने सोशल मीडियावर चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.
2. स्वप्निल जोशीचा हॉरर लूक.
'एलिझाबेथ कोण? हा प्रश्न चर्चेत असतानाचा आता 'बळी' चित्रपटाच्या नव्या पोस्टरमुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.
3. जान्हवीला मोठ्या पडद्यावर पाहून बोनी कपूरला झाला आनंद
'हवाहवाई' अभिनेत्री श्रीदेवीची लेक आणि बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री जान्हवी कपूरसाठी शुक्रवारचा दिवस खूप मोठा होता. काल जान्हवी कपूरचा हॉरर-कॉमेडी चित्रपट 'रुही' प्रदर्शित झाला आहे.
4. ऑस्कर नामांकित 'बिट्टू'ला प्रियंका चोप्राचा मदतीचा हात
अभिनेत्री प्रियंका चोप्राने फिल्मी जगात स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आता तिला इतरांनाही स्वतःप्रमाणे या क्षेत्रात चमकण्याची संधी द्यायची आहे.
5. 'द फॅमिली मॅन 2'तील काही दृश्यांचे पुन्हा शूटिंग
अभिनेता सैफ अली खानची मुख्य भूमिका असलेल्या 'तांडव' या वेबसीरिजवरून मोठा वाद निर्माण झाला होता. यापुढे कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी अॅमेझॉन प्राईम व्हिडीयोने कानाला खडा लावला.
Tags:
No comments
Post a Comment