12 मार्च सह्याद्री बुलेटिन

News24सह्याद्री - अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या कारचं तिहार जेल कनेक्शन...जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
१. काँग्रेस नगरसेवकच्या घरातून 100 पेटी दारू जप्त
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहरात काँग्रेस नगरसेवक महेश भरै यांच्या घरातून 100 पेटी दारू जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मुंबई येथून चंद्रपुरात आलेल्या उत्पादन शुल्क विभागाच्या विशेष भरारी पथकाने ही कारवाई केली.
२. 21 मार्चला होणार एमपीएससी ची परीक्षा!
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी MPSC पूर्व परीक्षा आता 21 मार्चला होणार आहे. पूर्वनियोजित 14 मार्चला होणारी परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांचा उद्रेक झाला होता. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल वचन दिल्याप्रमाणे, आज MPSC ने परीक्षेची नवी तारीख जाहीर केली आहे.
३. भंडारा जिल्ह्यात पावसाचा इशारा
पूर्व विदर्भामध्ये भंडारा जिल्ह्यात 12 मार्च ते 13 मार्च दरम्यान मध्यम स्वरूपाच्या पावसाचे संकेत हवामान विभागानं दिले आहेत.
४. अंबानींच्या घरासमोर सापडलेल्या कारचं तिहार जेल कनेक्शन
उद्योजक मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाबाहेर 25 फेब्रुवारी ला स्फोटकं असलेली स्कॉर्पिओ गाडी उभी करण्यात आल्यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली. ही स्कॉर्पिओ कोणाची होती? कुठून आली होती?
५. 'बॉम्बे बेगम' मधील दृष्यांवर बाल हक्क आयोगाचा आक्षेप
नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राइट्स कमिशनने गुरुवारी स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सला वेबसिरीज, 'बॉम्बे बेगम'चे प्रसारण थांबविण्यास सांगितलय. राष्ट्रीय बाल हक्क संस्थेने स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मला नोटीस बजावली आणि त्याद्वारे केलेल्या कारवाईबाबत 24 तासात सविस्तर अहवाल मागविला आहे.
६. लातूरच्या नगरसेवकाचा प्रामाणिकपणा
लातूर शहरातल्या भाजी मंडईमध्ये रस्त्यावर सापडलेले पैसे नगरसेवक इम्रान सय्यद यांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन परत केले आहेत.
७. कोरोना लसीचे दोन डोस घेऊनही जिल्हाधिकारी 'कोरोना पॉझिटिव्ह'
देशभरात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेने वेग पकडला असताना आता चिंता वाढवणारी एक बातमी समोर आली आहे.छत्तीसगडमधील जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही काही दिवसांनी ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
8. तालुकास्तरावर देखील डायलिसीसची सुविधा
राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून जिल्हास्तरावर असणारी डायलिसीसची सुविधा आता तालुकास्तरावर देखील उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
९ .सोन्या-चांदीची चमक पडली फिकी
देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरावर दबाव दिसून येत आहे. यावेळी, एमसीएक्सवर एप्रिल डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव 124 रुपयांच्या घसरणीसह 44,755 रुपयांवर होता.
१०. पुण्यात रात्रीची संचारबंदी
पुण्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहे. नुकतंच उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला
No comments
Post a Comment