3 मार्च फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन

News24सह्याद्री - कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर आरोग्य सेवकाचा मृत्यू....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये
TOP HEADLINES
1. 'तो' आमदार कोण? डीएनएवाला; प्रवीण दरेकर
आधी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि नंतर संजय राठोड यांचं प्रकरण थांबत नाही तोच आता भाजप महाविकास आघाडीच्या आणखी एका आमदाराच्या प्रकरणाचा पर्दाफाश होणार आहे. 2. संजय राठोडांचा राजीनामा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का?
शिवसेना नेते संजय राठोड यांनी वन मंत्रीपदाचा राजीनामा देऊन तीन दिवस उलटले तरी राठोड यांचा अद्याप राज्यपालांकडे पाठवण्यात आलेला नाही.
3. कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर आरोग्य सेवकाचा मृत्यू
राज्यात सध्या कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरु आहे. दरम्यान, या लसीकरणाच्या प्रक्रियेत एक धक्कादायक घटना समोर आली.
4. औरंगाबादमधील १४ वर्षीय मुलीची गळफास घेऊन आत्महत्या
व्हॉट्सॲपवर आलेली आत्महत्येची व्हिडिओ क्लिप वारंवार पाहू नको म्हणून आई रागावल्याने सातवीत शिकणाऱ्या १४ वर्षीय विद्यार्थिनीने साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री नऊच्या सुमारास उघडकीस आली.
5. भाजपने गुजरात दंगल ही चूक होती हे मान्य करावं: नवाब मलिक
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी ही चूकच होती, असं म्हटलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीने आता भाजपला घेरलं आहे.
6. आता राहुल गांधींनी जनतेसमोर उठाबश्या काढाव्यात; आशिष शेलार
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आणीबाणी ही चूक होती, असं विधान केल्यानंतर आता त्यावर प्रतिक्रिया उमटत आहेत. राहुल गांधी यांनी आणीबाणीवरून माफी मागितली. आणीबाणी ही चूक असल्याचं कबूल केलं. 7. सरकार काळजीवाहूचं आहे, शेतकरी मदतीवरुन देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. राज्याचा अर्थसंकल्प 8 मार्चला मांडला जाणार असून 10 मार्चला अधिवेशनाची सांगता होईल.
8. 50 कोटी वृक्षलागवड योजनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करणार : अजित पवार
50 कोटी वृक्षलागवड योजनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन करणार, असं उत्तर अजित पवार यांनी विधानसभेत दिलं. 50 कोटी वृक्षलागवड योजनेच्या चौकशी समितीला 4 महिन्यांचा वेळ दिला जाईल, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.
9. ध्रुवतारा बायोटेक या कंपनीला आग ५ कोटी रुपयांचे नुकसान
औरंगाबाद वाळूज एमआयडीसी तील ध्रुवतारा बायोटेक या कंपनीला मंगळवारी मध्यरात्री साडे तीन वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. लघुउद्योजक अशोक थोरात यांची ही कंपनी असून या कंपनीत दुचाकी व तीनचाकी वाहनांसाठी लागणारे प्लास्टिक स्पेअर पार्ट्स चे उत्पादन करण्यात येते.
No comments
Post a Comment