Breaking News

1/breakingnews/recent

पैसे किंवा कार-बाईक नाही, क्रिकेटपटूला ‘अमूल्य’ भेट,बाईकसाठी पाच लिटर पेट्रोल बक्षीस

No comments



मुंबई -

क्रिकेट स्पर्धेमध्ये विजेत्यांना कार-बाईकपासून वॉशिंग मशिन-मिक्सर अशी पारितोषिके मिळत असल्याचे आपण पाहिले आहे. ग्रामीण भागातील काही क्रीडा स्पर्धांमध्ये तर कोंबडी किंवा बोकडही विजेत्यांना दिले जाते. परंतु बक्षीस म्हणून चक्क पेट्रोल दिल्याचे आपण कधी पाहिले आहे का?  देशभरात इंधनाच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या कररचनेनुसार राज्या-राज्यांमध्ये पेट्रोलचे दर वेगवेगळे आहे. काही भागांमध्ये पेट्रोलच्या किमतींनी शंभरी गाठली आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये असाच काहीसा प्रकार घडल्याचे पाहायला मिळत आहे. भारतामध्ये क्रिकेट हा धर्म मानला जातो. 

केंद्र सरकारकडून सातत्याने होणाऱ्या पेट्रोल दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध करण्याचा पर्याय काँग्रेस नेत्याने शोधून काढला आहे. त्यासाठी भारतीयांचा श्वास असलेल्या क्रिकेटचे माध्यम निवडण्यात आले आहे. काँग्रेस नेते मनोज शुक्ला यांनी भोपाळमध्ये क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. रविवारी या स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या स्पर्धेच्या विजेत्यांना पैसे किंवा कार-बाईक नाही, तर याच कार-बाईकमध्ये टाकले  जाणारे पेट्रोल बक्षीस स्वरुपात देण्यात आले. 28 फेब्रुवारीला झालेल्या या स्पर्धेचा फोटो सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे. सामनावीर पुरस्काराने गौरव झाल्याने त्याला आयोजकांनी पाच लिटर पेट्रोल बक्षीस दिले. रोख इनाम देण्याऐवजी अब्बासीला ही अनोखी भेट देण्यात आली. हातात बॅट आणि पेट्रोलचा कॅन धरुन पंपासमोर उभ्या असलेल्या सलाऊद्दिन अब्बासीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटिझन्सनी या क्रिएटिव्ह बक्षिसाचं, आयोजकांचे कौतुक केले. तर मीम्स बनवण्यासाठी ट्रोलर्स आणि मीमर्सनाही खाद्य मिळाले.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *