Breaking News

1/breakingnews/recent

‘ट्विटरवर #अजय_देवगन_कायर_है हा हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये, पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण

No comments




मुंबई -

बॉलिवूड अभिनेता अजय देवगन सध्या चर्चेत आला आहे. अजय देवगंही त्याच्या सोसिअल मीडियामूळ कायम चर्चेत असतो. अजय मुंबईच्या फिल्मसिटीकडे जात असताना एका व्यक्तीने अजयची गाडी अडवून शेतकरी आंदोलनावर भाष्य करण्याची विनंती अजयला केली आहे. मात्र, यासर्व प्रकरणानंतर त्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. आता त्याला जामीन देखील मिळाला आहे. मात्र, यासर्व प्रकरणानंतर आता ट्विटरवर #अजय_देवगन_कायर_है हा हॅशटॅग टॉप ट्रेंडमध्ये आहे. फेब्रुवारीमध्ये शेतकरी आंदोलनावर देशभर चर्चा सुरू होती, तेव्हा अजय देवगन यांनी या आंदोलनावर एक ट्विट करत म्हटंले होते की, हा खोटा प्रचार सुरू आहे.

 मात्र, त्या व्यक्तीने अजयची गाडी थांबून फक्त म्हटंले होते की, शेतकरी आंदोलनावर तुम्ही काहीतरी बोला आणि अजयची गाडी अडवल्यामुळे त्याला पोलिसांनी अटकही केली होती. मनजिंदर सिंह सिरसा यांनी सोशल मीडियावर या व्यक्तीला सोडल्याची माहिती दिली आहे. राजदीप सिंहच्या म्हणण्यानुसार, शेतकरी आंदोलनाला शंभरहून अधिक दिवस झाले तरी अजयने शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ कोणतंही मत व्यक्त केले नाही म्हणून त्याने अजयची गाडी अडवून विचारण्याचा प्रयत्न केला.राजदीपने 15 ते 20 मिनिटे अजयची गाडी अडवून ठेवल्याचं समोर आले आहे.


No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *