Breaking News

1/breakingnews/recent

10 मार्च फेब्रुवारी सह्याद्री बुलेटिन

No comments

    News24सह्याद्री उन्हाळ्यामुळे कोरोना वाढणार नाही - राजेश टोपे....जाणून घ्या महत्वपूर्ण घडामोडींचा आढावा सह्याद्री बुलेटिनमध्ये




TOP HEADLINES

1. 'सायलेंट किलर' पाणबुडी 'आयएनएस करंज' आजपासून नौदलाच्या ताफ्यात

सायलेंट किलर म्हणून ओळखली जाणारी आयएनएस करंज पाणबुडी आज नौदलाच्या ताफ्यात सामील झाली आहे. करंज पाणबुडी कोणताही आवाज न करता शत्रूच्या हद्दीत प्रवेश करुन हल्ला करते. करंज पाणबुडीला मुंबईतील वेस्टर्न कमांडच्या नेव्हल हेडक्वार्टरमध्ये लष्करी परंपरेनुसार युद्धनौकांमध्ये सामील करण्यात आलं. 

2. मुकेश अंबानींच्या घराबाहेरील सुरक्षारक्षकांची चौकशी होणार?

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. याप्रकरणाचा तपास करण्यासाठी आता राष्ट्रीय तपास यंत्रणेचे पथक मुंबईत दाखल झाले आहे. 

3. उन्हाळ्यामुळे कोरोना वाढणार नाही -  राजेश टोपे
कोरोनाचा साथ वाढण्याचा वातावरणाशी कोणताही संबंध नाही. त्यामुळे उन्हाळ्यात कोरोना वाढणार नाही, असे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. 

4. वाझेंना क्राईम ब्रॅचमधून हटवलं
हिरेन मनुसख प्रकरणात विरोधकांच्या सभागृहातील गदारोळानंतर राज्य सरकारने सचिन वाझे  यांना गुन्हे शाखेतून हटवण्याचा निर्णय घेतला आहे. 

5. जंगलात बसून पेपर सोडवण्याची विद्यार्थ्यांवर वेळ
इंटरनेटचं कमी सिग्नल आणि अचानक आलेल्या तांत्रिक बिघाडामुळे गोंडवाना विद्यापीठाची  मोबाइलवर ऑनलाइन परीक्षा देणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांची चांगली दमछाक झाली. काहींनी गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवर जाऊन तर काहींनी नेटवर्कच्या शोधात थेट छत्तीसगढ सीमेपर्यंत धाव घेत पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला.

6. सुलभतेसाठी अधिक लसीकरण केंद्रे
पालघर : जिल्ह्यतील ३४ केंद्रांमधून करोना प्रतिबंधात्मक लसीकरण सुरू असून ३५ हजार नागरिकांना लसीची पहिली मात्रा तर आठ हजारांहून अधिक शासकीय कर्मचाऱ्यांनी लसीची दुसरी मात्रा घेतली आहे.

7. लातुरात विलासरावांच्या पुतळ्याशेजारी गोपीनाथरावांचा पूर्णाकृती पुतळा
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे  आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा दोस्ताना संपूर्ण महाराष्ट्राला ठाऊक आहे. 

8. बीड प्रशासन अॅक्शन मोडमध्ये  
वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी बीडचं प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. आधी व्यापाऱ्यांनी कोरोना चाचणी करावी मगच त्यांना दुकाने उघडायला परवानगी मिळेल, अशी सक्त ताकीद जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.

9. रेल्वेत नोकरीच्या नावाखाली तरुणांना लाखोंचा गंडा

रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्याने तरुणांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार अंबरनाथ पोलिसांनी उघड केला आहे. याप्रकरणी आयआरसीटीसीच्या  एका कर्मचाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे कैलास राजपाल सिंग असं या आरोपीचं नाव आहे.

10. चंद्रकांत पाटलांचा ठाकरेंना इशारा

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात भाजपाकडून पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. हिरेन यांच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीचा हवाला देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सचिन वाझे यांनी हिरेन यांचा खून केल्याचं म्हटलं होतं. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *