Breaking News

1/breakingnews/recent

10 मार्च सह्याद्री वेगवान आढावा

No comments

        News24सह्याद्री - माझा जीव घ्या पण मुलांना सोडून द्या; म्यानमारच्या ननची याचना...पहा राज्यातील आणि जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा वेगवान आढावा




TOP HEADLINES


1. अनुकंपा नोकरीसाठी महिलेला शरीरसुखाची मागणी, तरुणीचा आरोप
नुकतेच काल जगात सर्वत्र महिला दिन साजरा केला गेला असून लातुरात एका महिलेला अनुकंपा तत्त्वावर नोकरीची नियुक्ती देण्यासाठी चक्क शरीर सुखाची मागणी केली.

२.सताळा येथील सरपंचाचे शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालया समोर शेत रस्ते, शिव रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यासाठी आमरण उपोषण
लातूर जिल्ह्यातील अहमदपुर तालुक्यातील सताळा या गावच्या सरपंच सौ.सुवर्णाताई बालाजी बैकरे,या शेतकऱ्यासह  सताळा शिवरातील शेत रस्ते, शिव रस्ते व नकाशा वरील सर्व रस्ते अतिक्रमण मुक्त करून शेतकऱ्यांना मालाची ने आन करण्यासाठी व येण्याजाण्यासाठी खुली करून द्यावेत म्हणून जिल्हाधिकारी कार्यालया समोर  महिला दिनापासुन आमरण उपोषणाला बसल्या आहेत.

3. खा. सुधाकर श्रृंगारे यांनी घेतली कोवीड लस
खासदार सुधाकरराव श्रृंगारे यांनी दिल्ली येथे संसदेच्या अॅनेक्सी ब्लिडींगमध्ये देशातील खासदारांसाठी सुरू करण्यात आलेल्या कोवीड लसिकरण केंद्रात मंगळवारी (दि.९) कोवीडची लस घेतली. ही लस पूर्णपणे सुरक्षीत असून सर्व जनतेने केंद्राच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार ती घेवून स्वताला व आपल्या कुटुंबाला सुरक्षीत ठेवावे असे आवाहन त्यांनी जिल्हावाशीयांना केले आहे. 

4. ‘लॅन्सेट’मधील संशोधनपर लेखात शिक्कामोर्तब
भारताची स्वदेशी लस म्हणून मान्यता पावलेली भारत बायोटेकची कोविड १९ प्रतिबंधक लस सुरक्षित असून प्रतिकारशक्ती वाढवणारी आहे. त्याचे कुठलेही विपरित सहपरिणाम होत नाहीत, असे शिक्कामोर्तब लॅन्सेट इनफेक्शियस डिसिजेस जर्नलने केले आहे.

5. भारत पाकिस्तानला ४.५ कोटी लसींचा पुरवठा करणार आहे
भारत पाकिस्तानला ४.५ कोटी लसींचा पुरवठा करणार आहे. United GAVI alliance अंतर्गत भारताकडून हा लसींचा पुरवठा होणार असल्याचं राष्ट्रीय आरोग्य सेवा, नियमन आणि समन्वय फेडरल सेक्रेटरी आमीर अशरफ ख्वाजा यांनी सार्वजनिक लेखा समितीला सांगितलं आहे. 

6. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचं नाव शर्यतीत
भाजपा पक्षश्रेष्ठीच्या नाराजीनंतर उत्तराखंडचे त्रिवेंद्र सिंह रावत यांना मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर रावत यांनी राज्यपालांकडे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला. 

7. माझा जीव घ्या पण मुलांना सोडून द्या”; म्यानमारच्या ननची याचना
उत्तर म्यानमार शहरामध्ये सशस्त्र पोलिस अधिकाऱ्यांच्या गटापुढे गुडघे टेकून सिस्टर अ‍ॅन रोझ नु ताँग यांनी “माझा जीव घ्या पण मुलांना सोडून द्या” अशी विनंती केली.

8. “पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारात उसळलेल्या गर्दीत करोना चिरडून मेला काय?”
मुंबईत कोरोना वाढला त्याचे खापर ‘लोकल ट्रेन्स’वर फोडले जात आहे. तसे असेल तर दिल्लीतही ‘मेट्रो’ सुरू आहेत. लोकांनी स्वयंशिस्त पाळायला हवी. स्वतःवरच काही निर्बंध घालून जगायला हवे. 

9. देशात एका दिवसात २० लाख जणांचे लसीकरण
आठ मार्च रोजी देशात वीस लाख लोकांना एकाच दिवशी करोना प्रतिबंधक लस देण्यात आली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत २.३ कोटी लोकांना करोना प्रतिबंधक लस देण्यात आली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

10. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांचा संशय
पूजा चव्हाण आणि हिरेन मनसुख प्रकरणात पुरावे नष्ट करण्याची ठाकरे सरकारची मोडस ऑपरेंडी एकाचप्रकराची असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनी व्यक्त केला. 

No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *