मोठी बातमी - भाजपच्या कार्यकर्त्यावर आली भाजपविरुद्धच आंदोलन करण्याची वेळ

News24सह्याद्री -
अहमदनगर महानगर पालिकेच्या कारभाराविषयी नेहमीच ओरड होत असते, विशेष म्हणजे शहरातील खड्ड्यांबाबत सध्या नागरिकांनमधून मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली जात आहे, मात्र तरीही महानगर पालिका प्रशासनावर याचा कोणताच परिणाम होताना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी महानगर पालिकेने मोठा गाजावाजा करत शहरातील खड्डे बुजवण्याची मोहीम हाती घेतली होती मात्र हि माहीम फक्त फोटोसेशन पुरतीच राहिली का असा प्रश्न आता नागरिक विचारात आहेत, कारण नगर शहरातील खड्डे जैसे थे च असून त्यावर कोणतीही प्रक्रिया न केल्याचं चित्र दिसत आहे, उपनगरातील गुलमोहर रस्त्यावर खड्ड्यांबाबत एक अनोखे आंदोलन करण्यात आले असून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यातच गाडी टाकून सामाजिक कार्यकर्ते शिरीष जानवे यांनी महानगर पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन केले आहे.
No comments
Post a Comment