Special report - नीलेश समाजसेवेसाठी वेडा झालेला माणूस आहे - अण्णा हजारे

News24सह्याद्री -नीलेश समाजसेवेसाठी वेडा झालेला माणूस आहे - अण्णा हजारे....पहा सह्याद्री special रिपोर्ट
अहमदनगर जिल्ह्यातील नगर पारनेर मतदारसंघाचे आमदार यांचा वाढदिवासाच्या निमित्ताने नगर सह्याद्रीने केलेल्या विशेष पुरवणीचे प्रकाशन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी अण्णा हजारे यांनी आमदार निलेश लंके यांच्या कामाचे कौतुक केले. आमदार नीलेश लंके यांची काम करण्याची पद्धत, त्यांचे विचार, त्यांचा दूर दृष्टीकोन, सामाजिक, राजकीय काम हे अत्यंत महत्वाचे आहे. तहान भूक विसरुन नीलेश समाजसेवेसाठी वेडा झालेला माणूस आहे. स्वतच्या जीवनाचा त्याग करुन त्यांनी स्वतःला समाजसेवेत वाहून घेतले आहे.
त्यांचे काम हे देशात ठसा उटविणारे आहे. नीलेशच्या हातून होत असलेल्या कामामुळे पारनेर तालुका हा देशात उठून दिसेल, असे गौरवोद्गार ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी काढले.राजकारणात असा प्रामाणिक निष्कलंक माणूस असणे म्हणजे पारणेरकारांचे भूषण असल्याचं हि अण्णांनी सांगितलंय नगर सहयाद्री च्या वतीने काढलेल्या आमदार निलेश लंके यांच्या कामाच्या विशेष पुरवणीचे अण्णा हजारे यांनी कौतुक केले असून निलेश लंके यांनी आपल्या कामाची गती अशीच चालू ठेवली तर पारनेर तालुका देशाच्या नकाशावर वेगळे अस्त्वित्व निर्माण करेल असा विश्वास अण्णा हजारे यांनी व्यक्त केला.
No comments
Post a Comment