Breaking News

1/breakingnews/recent

23 मार्च सह्याद्री टॉप १० न्युज

No comments

News24सह्याद्री - आमदार रोहित पवारांचा केंद्र सरकारवर ट्विटरवरून हल्लाबोल...पहा  जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप १० मध्ये  




TOP HEADLINES


1. आमदार रोहित पवारांचा केंद्र सरकारवर ट्विटरवरून हल्लाबोल
संसदेत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची झालेली मागणी, राज्यात विरोधी पक्षनेत्यांनी केलेले ट्विट्स, काहींनी राज्यपालांना भेटून राष्ट्रपती राजवट लागू करण्याची केलेली मागणी या गोष्टी बघता विरोधी पक्ष सत्तेसाठी किती उतावीळ झालाय, हे सगळ्या महाराष्ट्राने आज पाहिलं.

2. कोरानो काळात ‘राजहंस’ शेतकऱ्यांच्या पाठीशी : थोरात
कोरोना महामारीत जनजीवन ठप्प झाले. लॉकडाऊनमुळे वाहतूक खोळंबल्याने दूध विक्रीवर परिणाम झाला. सर्वच व्यवहार अडचणीत आल्याने खाजगी दूध संस्थांनी दूध घेणे बंद केले. 

.नेवासे तालुक्यातील पानेगाव येथील शेतकरी रामदास तबाजी गागरे यांचा दोन एकर ऊस सोमवारी दुपारी ३ वाजता वीज पडून जळाला. नेवासे तालुक्यातील पश्चिम भागात असणाऱ्या पानेगाव येथे वीज पडल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.

4. आमदार डॉ. किरण लहामटे यांनी दिले परिसरातील शेतकऱ्यांना आश्वासन
कोतूळ मुळा नदीवर नवीन उंच पूल बांधण्यात यावा, याकरिता कोतूळ येथील नियोजित कोतूळ पूल कृती समितीने वारंवार पाठपुरावा केला. 

5. गृहमंत्री देशमुख आणि मुख्यमंत्री ठाकरेंनी राजीनामे द्यावे : पाचपुते
महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांवर होत असलेले भ्रष्टाचाराचे आरोप, राज्यात बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, महिलांवर वाढत चाललेले अत्याचार व यावर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरलेल्या भ्रष्टाचारी सरकार विरोधात आमदार बबनराव पाचपुते यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष श्रीगोंदे यांच्या वतीने सोमवारी सकाळी ११ वाजता श्रीगोंदे शनिचौक येथे मुख्यमंत्री व गृहमंत्री या खंडणी वसूल बहद्दरांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनाम्याची मागणी करत राज्यात राष्ट्रपती राजवट करावी.

6. श्रीगोंदे नगर पालिकेच्या विविध समित्यांचे सभापती व उपसभापती बिनविरोध
नगरपरिषदेच्या विविध समिती सभापतिपदाची निवडणूक सोमवारी बिनविरोध पार पडली. या निवडणुकीसाठी पिठासीन अधिकारी म्हणून प्रांताधिकारी स्वाती दाभाडे यांनी काम पाहिले. त्यांना सहाय्यक म्हणून मुख्याधिकारी मंगेश देवरे यांनी मदत केली.
7. हिरण हत्याप्रकरणी खटल्यात त्रुटी राहू नयेत; भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाची मागणी
बेलापूर येथील गौतम हिरण यांचे अपहरण व हत्या प्रकरणात पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली असून या आरोपींवरील कायदेशीर प्रक्रियेत तांत्रिक त्रुटी राहू नयेत व त्यांना कठोर शासन व्हावे.

8. कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजपची निदर्शने, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
या  बाबतीत अधिक असे की आयपीएस अधिकारी परमवीरसिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या वसुलीच्या आरोपानंतर  भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यभरात  महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ आंदोलने केली जात असून त्याचाच एक भाग आज कोपरगाव शहरात पाहायला मिळालं.

9. बालमटाकळीत छत्रपती शिवाजी महाराज चौकात पाणपोईचे उद्धाटन.....!
शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ओमसाई ग्रुपच्या वतीने स्व.भगवानराव आंदुरे यांच्या स्मरणार्थ शंकरनाना पाणपोई या नावाने ग्रामस्थांना तसेच वाटसरूंना पाणी पिण्यासाठी पाणपोई टाकून आंदुरे यांनी समाजापुढे एक आदर्श निर्माण केला असून सदरील पाणपोईचे उद्घाटन हे श्री क्षेत्र बालमटाकळी येथील नारायणदास गडाचे मठाधिपती महंत ह.भ. प. बालकदास महाराज तसेच गावातील माजी उपसरपंच तथा जेष्ठ कार्यकर्ते सुदामराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. 

10 ‘केदारेश्वर’चा आदर्श घेऊन प्रस्थापितांनी गारपिटग्रस्तांना मदत द्यावी
जिल्ह्यातील प्रस्थापित पुढारी केदारेश्वर कारखान्याला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाहीत. मात्र, शेतकरी अडचणीत आल्यावर कशाचीही पर्वा न करता ढाकणे कुटुंब धीर देण्यासाठी पुढे असते. 



No comments

Post a Comment

Contact Me

Name

Email *

Message *