सोन्या चांदीच्या किंमतीत सातत्याने घसरण

नवी दिल्ली -
भारतीय बाजारात सोन्याच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. मंगळवारीही सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत प्रचंड घसरण झाली. आज सोन्याच्या किंमती 100 ग्रॅम प्रति 1,200 रुपयांनी कमी झाल्याचे दिसून आले, म्हणजेच प्रति 10 ग्रॅम 120 रुपयांपर्यंत पोहोचले आहे. जागतिक निर्देशांदरम्यान भारतात सलग दुसर्या दिवशी सोन्याच्या किंमती खाली आल्या. एमसीएक्सवर सोन्याचे वायदा दर 10 ग्रॅम 0.24 टक्क्यांनी घसरून 44,795 वर, तर चांदी 0.5% खाली घसरून 66,013 प्रती किलो झाली. मागील व्यापार सत्रात सोन्याचे दर 0.18% तर चांदी 1.6% खाली घसरली. दिल्ली सराफा बाजारात मंगळवारी 22 कॅरेट सोन्याचे भाव प्रति 100 ग्रॅम 4,38,000 रुपये आणि दिल्ली सराफा बाजारात प्रति 10 ग्रॅम 43,800 रुपये आहेत. त्याचबरोबर 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 100 ग्रॅम 4,47,950 रुपये आणि प्रति 10 ग्रॅम 44,795 रुपये आहे. सोमवारी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 302 रुपयांची घट झाली होती.
सोमवारी चांदीच्या किंमती 1.6 टक्क्यांनी घसरल्या. मंगळवारी चांदीच्या भावातही किंचित घट नोंदली गेली. सराफा बाजारात चांदीचा दर आज 66,013 रुपये प्रतिकिलोवर आला. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्ड 0.3% घसरून 1,733.69 डॉलर प्रति औंस. अन्य मौल्यवान धातूंमध्ये चांदी 0.6% टक्क्यांनी घसरून 25.61 डॉलर आणि प्लॅटिनम 0.3% खाली घसरून 1,179.59 डॉलरवर बंद झाली. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक कमोडिटीज तपन पटेल म्हणाले की, या आठवड्यात व्यवसाय आणि गुंतवणूकदारांचं लक्ष अमेरिकन बाँडकडे आहे. यामुळे सोमवारी सोन्याच्या दरावर दबाव होता. अमेरिकन बाँडचे उत्पन्न आणि मजबूत डॉलरमुळे सोन्याच्या विक्रीचा व्यापार पाहायला मिळाले आहे.
आकडेवारीनुसार सोन्याच्या आयातीतील कपातीमुळे देशातील व्यापार तूट कमी होण्यास मदत झाली. चालू आर्थिक वर्ष 2020-21 च्या पहिल्या 11 महिन्यांमध्ये एप्रिल-फेब्रुवारी सोन्याची आयात 3.3 टक्क्यांनी घसरून 26.11 अब्ज डॉलरवर गेली. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत व्यापार तूट 84.62 अब्ज डॉलर्सवर गेली, जी गेल्या वर्षी याच कालावधीत 151.37 अब्ज डॉलर्स होती.
No comments
Post a Comment