सह्याद्री Breaking - अखेर बाळ बोठे पोलीस कोठडीत

News24सह्याद्री -
रेखा जर हत्याकांड प्रकरणातील आरोपी बाळ बोटे याला काल हैद्राबाद येथून पकडल्या नंतर आज पारनेर पोलिसांनी पारनेर न्यायालया समोर हजर केले होते नायायालयात बाळ बोठे याच्या वतीने ऍड महेश तवले, संकेत ठाणगे यांनी बाजू मांडली तर सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील बागले यांनी बाजू मांडली दोन्ही बाजूंचा युक्तिवाद झालाय नंतर न्यालयालयाने आरोपी बाळ बोठे याला२० मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बाळ बोटे याला पकडल्या नंतर पारनेर पोलीस स्टेशन च्या लोकअप र्रोम मध्ये राञभर ठेवण्यात आले होते आज न्यायालयात घेऊन जाताना बाळ बोठे याच्या हातात बेड्या ठोकण्यात आल्या होत्या तर न्यायालयापर्यंत बाळ बोठेला चालत नेण्यात आले होते तर
न्यायालयात मयत रेखा जरे यांचा मुलगा रुणाल जरे हा ऍड सचिन पटेकर यांच्या सोबत हजर होता त्याच बरोबर बाळ बोटे याची पत्नी सविता बोठे हि पण
न्यायालयात हजर होती बोठे याला आता २० मार्च पर्यंत पोलीस कोठडी मिळाल्याने रेखा जर यांची हत्या का करण्यात आली आणि या बाबतची आणखीन माहिती पोलिसांना मिळणार आहे.
No comments
Post a Comment