मोठी बातमी - जबाबदारी न पाळणारा राज्यपाल महाराष्ट्राने पाहिला - शरद पवार

News24सह्याद्री -
आताची मोठी बातमी हाती येतेय राष्टवादी काँग्रेस चे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनी बारामती येथे पत्रकार परिषद घेतली असून या पत्रकार परिषदेत त्यांनी पाच राज्यातील निवडणुकांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आसाम वगळता इतर राज्यात भाजपाचा पराभव होईल हा ट्रेंड असून हा पाच राज्याचा ट्रेंड देशाला दिशा देणारा ठरेल असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. बारामतीमध्ये शरद पवार बोलत होते. पाच राज्यातील निवडणूकांवर आज सांगणे कठीण आहे ,परंतु लोक निर्णय घेत असतात पण त्या राज्यांची स्थिती मला माहित आहे. त्यामध्ये माझ्या दृष्टीने केरळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह डावे एकत्र आले आहेत.
राज्यही त्यांच्या हातात आहे. त्यामुळे केरळमध्ये आम्हाला स्पष्ट बहुमत मिळेल यात शंका नाही ,असेही शरद पवार म्हणाले. यावेळी शरद पवार यांनी सचिन वाझेंबाबत मात्र बोलणं टाळलं. राज्यपालांबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रच्या इतिहासात लोकशाहीची आणि घटनेत असणारी जबाबदारी न पाळणारा राज्यपाल कधी महाराष्ट्राने पहिला नाही. केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेतंय ही बाब चिंताजनक आहे, असा टोला शरद पवार यांनी यावेळी लावला आहे.
No comments
Post a Comment