सह्याद्री Breaking - रेखा जरे हत्याकांडात विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती

News24सह्याद्री -
यशस्वीनी महिला ब्रिगेडचे अध्यक्ष रेखा जरे यांची हत्या 30 नोव्हेंबर रोजी नगर पुणे रोडवर सुपा परिसरात अत्यंत निर्घुणपणे हत्या झाली होती. या घटनेला आता तीन महिने उलटून गेले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी खून करणारे पाच आरोपी दोन दिवसात पकडले होते .मात्र यातील प्रमुख आरोपी बाळ बोठे हा अद्याप पर्यंत फरार असून पोलीस त्याचा तपास घेत आहेत. याबाबत मयत रेखा जरे यांच्या कुटुंबीयांनी बाळ बोठे याला अटक करावी या मागणीसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषणही केले होते .मात्र आश्वासना शिवाय त्यांच्या हातात काहीच पडलेले नाही. या प्रकरणाला तीन महिने झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. त्यामुळे आता या प्रकरणात सरकारी
विशेष सरकारी वकील म्हणून उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाळ बोठे नऊ एप्रिल पर्यंत स्वतःहून न्यायालयासमोर हजर झाला नाही तर त्यांच्या मालमत्तेवर पोलीस टाच आणू शकतात त्यामुळे आता बोठे याच्या अटके कडे किंवा तो हजर होतोय का याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे
No comments
Post a Comment