जिल्ह्याची खबरबात - व्यापारी गौतम यांचा डोक्याला मार लागून मृत्यू

News24सह्याद्री - व्यापारी गौतम यांचा डोक्याला मार लागून मृत्यू...पहा जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्या
TOP HEADLINES
1. राहुरी दर तासाला एक रुग्ण कोरणा च्या जाळ्यात
राहुरी नगर जिल्हा प्रशासनानेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे नागरिकांना वारंवार सूचना देऊनही नियमांचे पालन होत नाही कोरोना चा प्रादुर्भाव कायम असताना हे नागरिक विना मास्क फिरत आहे.
2. अहमदनगर जिल्ह्यातील शेतकरी झालेत थकबाकी मुक्त
राज्याचे ऊर्जामंत्री डॉक्टर नितीन राऊत यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या नवीन कृषी पंप विज धोरणात शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे.
3. शेतकऱ्यांचा महावितरण कार्यालयातच दशक्रिया विधी करू
नगर तालुक्यातील आठवड येथील शेतकरी नानासाहेब मोरे यांचा दिनांक 6 रोजी विद्युत तार अंगावर पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
4. आगीत चार एकर ऊस जळुन खाक झाला
शेवगाव तालुक्यातील लोळेगाव येथेल बाबासाहेब काळे गट क्रंमाक 118 या शेतकऱ्याचा
लाईट शॉर्टसर्किटने चार एकर ऊसाला अचानक आग लागली .
5. जागतिक महिला दिनाच्या निमित्त कोरोना लसीकरणाला सुरवात
शेवगांव तालुक्यातील बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरण मोहीमेला जागतिक महिला दिनाच्या निमित्त सुरवात करण्यात आली आहे.
6. व्यापारी गौतम यांचा डोक्याला मार लागून मृत्यू
व्यापारी गौतम यांचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचं एक उत्तरीय तपासणीत समोर आल आहे. या प्रकरणात एकूण 40 ते 45 अंश एक चौकशी करण्यात आली आहे.
7. महिला मुलींची छेडछाड करणाऱ्यांची गय केली जाणार नाही
जामखेड शहरासह तालुक्यात जर कोणी महिला आणि मुलींची छेडछाड करत असेल किंवा त्रास देत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही असं आश्वासन पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी महिलांना आणि मुलींना बोलताना केला आहे.
8. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव शिवारात अपघात
संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव शिवारात शिवशाही बस ने दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जण ठार झाला.
9. अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील कामगारांना मोफत कोरोना लस द्यावी
आजच्या काळात आपल्या जीवावर उदार होऊन अन्नधान्य वितरण व्यवस्थेतील काम करणारी कामगारांनी ही वितरण व्यवस्था निर्विघ्नपणे पार पाडले आहे.
10. माहेगाव देशमुखला प्राथमिक आरोग्य केंद्रास मंजुरी:आमदार आशुतोष काळे
कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख व पंचक्रोशीतील जवळपास १० ते १२ गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने माहेगाव देशमुख येथे प्राथमिक केंद्रास मंजुरी दिली.
11. आपत्कालीन मदतकार्य सेवा देणाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद
अनेक आपत्कालीन संकटात स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांना मदतकार्य आणि सेवा देणार्यांचे कार्य कौतुकास्पद असून देशप्रेमाने भारावलेले व्यक्तीमत्व आणि त्यांचे संस्थांचे माध्यमातून होत.
No comments
Post a Comment