पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढीमुळे काँग्रेसच्यावतीने पेट्रोलियम मंत्रालयाबाहेर जोरदार निदर्शने

दिल्ली -
गेल्या अनेक दिवसा पासून पेट्रोल व डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. देशात पेट्रोल व डिझेलचे दर मोठ्याप्रमाणावर वाढले आहे. अनेक शहरांमध्ये दर पेट्रोलच्या दराने शंभरीच गाठली आहे. यामुळे सर्वसामान्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेससह विरोधी पक्ष मोदी सरकारला धारेवर धरत आहे. अनेक ठिकाणी केंद्र सरकारविरोधात इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आंदोलन देखील केली जात आहे. आज(मंगळवार) राजधानी दिल्लीत देखील युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोलियम मंत्रालयाबाहेर जोरदार निदर्शने करण्यात आली आहेत.
ही निदर्शने गॅस दरवाढीच्या विरोधात देखील होती. दरम्यान, आक्रमक झालेल्या काही निदर्शकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे देखील समोर आले आहे. या अगोदर युवक काँग्रेसच्यावतीने पेट्रोल-डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ शनिवारी केंद्रीयमंत्री स्मृती इराणी यांच्या निवासस्थानाबाहेर देखील आंदोलन केले होते. काल(सोमवाीर) एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत पुन्हा एकदा २५ रुपयांची वाढ झाली. यामुळे अगोदर पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे त्रस्त असलेल्या सामान्यांना मोठा झटका बसला. यावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता. एलपीजी सिलिंडरचे दर पुन्हा एकदा वाढले, जनतेसाठी मोदी सरकारचे पर्याय – व्यवसाय बंद करा- चूल फुका- खोटी आश्वासनं ऐकून पोट भरा! असे ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर टीका केलेली आहे.
No comments
Post a Comment