नवी मुंबईत आघाडीत बिघाडीची चिन्हं, राष्ट्रवादीचा आणखी एक नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

मुंबई -
महाराष्ट्र राज्यात तीन पक्षांचे सरकार भक्कमपणे काम करत असले तरी, स्थानिक पातळीवर महाविकास आघाडीमध्ये आलबेल नसल्याचे पुढे येतअसल्याचे समजत आहे. नवी मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे म्हटले जात आहे. महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ही नाराजी आता समोर येतेय. येथील राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पार्टीचे युवक जिल्हाध्यक्ष राजेश भोर पक्ष सोडण्याच्या तयारीत आहे. राज्यात कोल्हापूर, औरंगाबाद, मुंबई, नाशिक, वसई विरार तसेच नवी मुंबई या महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहे. कधीही निवडणुकीची घोषणा होऊ शकते. या पार्श्वभूमीवर राज्यात नेत्यांनी राजकीय गणितं आखायला सुरुवात झाली आहे. राज्यात राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले असले तरी, स्थानिक पातळीत परिस्थिती नाजूक आहे.
विशेषत: नवी मुंबईमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. येथे युवक राष्ट्रवादीचे 70 % कार्यकर्ते नवी मुंबईतील नेत्यांवर नाराज असल्याचे सांगण्यात येतं आहे. याच नाराजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेच युवक जिल्हाध्यक्ष राजेश भोर यांनी पक्षाला रामराम ठोकण्याचे असल्याची सध्या नवी मुंबईत चर्चा आहे. याविषयी विचारले असता, त्यांनी पक्षाबाबत असलेली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे. राष्ट्रवादीमध्ये निष्ठावंतांवर अन्याय होत आहे. महापालिकेसाठी जागावाटप करताना मोठा घोळ करण्यात आला असे भोर यांनी म्हटलंय. तसेच पक्षात सुरू असलेली गटबाजी आणि होत असलेली राजकीय कुचंबना याला कंटाळून ते पक्ष सोडण्याचा निर्णय घेणार आहेत, असे म्हटले जातंय. दरम्यान, राजेश भोर हे पक्षाच्या राजीनाम्याबाबतची लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. तसेच, ते कुठल्या पक्षात जाणार याबाबातही ते पत्रकार परिषदेत सांगणार आहेत. मात्र, महापालिकेच्या तोंडावर राष्ट्रवादीमधून समोर आलेली ही नाराजी सध्या नवी मुंबईच्या राजकीय गोटात चर्चेचा विषय ठरत आहे.
No comments
Post a Comment